पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुम्ही दुस-याच्या गरजा, आवड निवड समजूनच घेत नाही. तुम्ही देणे कमी, घ्यायला जास्त शिकता. ऐकता कमी, बोलायला जास्त शिकता. ब-याचश्या घरात चांगली मुलगी तिलाच मानतात जी लाजते, खाली बघून चालते, कोमल आहे, आणि घराच्या बाहेर पडत नाही, घरातच रहाते. तुम्हाला स्वयंनिर्भर, स्वाभिमानी व्हायचं शिकवलंच जात नाही. जर तुम्ही मोकळेपणाने बोललात , उठला बसला तर काय ही मुलगी मुलांसारखी वागते असे म्हटले जाते. या सर्व संस्काराचा तुमच्या वागण्यावर आणि नात्यावर खूप परिणाम होतो. ० तुम्हाला जे शिकवले जाते त्याच्या विरुद्ध मुलांना शिकवले जाते.त्या मुळे बरोबरीचे नाते निर्माण होणे 2 अवघड बनते. समाजातील नाते,दोस्तीची सुरुवात तुम्ही नाही करावयाची.असे तुम्हाला शिकवले जाते. 106