या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
तुम्हा मुलाकडून लाज, कोमलता,गोड बोलणं याची अपेक्षाच ठेवली जात नाही. तुम्हाला बाहेर जायला, जग बघायला , मजबूत व्हायला ,रडायचं नाही अश्या गोष्टी शिकवल्या जातात. तुमच्या पैकी काहीजण कोमल असू शकतात. मारामारी करु इच्छित नाहीत. पण तुम्हाला मुलगी म्हणून चिडवले जाते इच्छा नसताना पण तुम्हाला मर्दानगी शिकविली जाते. या पध्दतीच्या संस्काराचा तुमची नाती आणि वागण्यावरही परिणाम होतो.तुम्हाला जे शिकवले जाते त्या पेक्षा विरुद्ध मुलींना शिकवले जाते. त्यामुळे तुमच्यात आणि मुलींमध्ये समानतेचं नातं निर्माण होवू शकत नाही. तुमच्यातील कित्येकजण मुलींना चिडवण्यात आनंद मानतात. कित्येकदा दोस्तीमध्ये बरोबरी असतच नाही. 107