पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उच्चवर्णीय समाज स्वीकार करत नाही, उलट ती प्रसंगोप्रसंगी ठेचायचा प्रयत्न करतो हा अधिक आहे. मराठीतला विजय तेंडुलकरांनी लिहिलेला व जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या 'सामना' चित्रपटातील मास्तरांचा आर्त व नैतिक प्रश्न मारूती कांबळेचं काय झालं?' आजही तेवढाच जिवंत व प्रखर आहे. मारूती कांबळे हे केवळ रूपक नाही, तर दलित व 'नाही रे' वर्गाच्या दडपल्या जाणा-या अस्मितेचा आकांत आहे. आता सुदैवानं दलितातून नवं नेतृत्व पुढे येत आहे, जे भारतीय संविधानानं त्यांना दिलेले अधिकार मागत आहेत. त्यासाठी संघर्ष व्हावा, हे भारतीय समाजाला एकविसाव्या शतकात शोभत नाही. त्यामुळे सरकार, राजकीय पक्ष व व्यवस्था आणि आपण सान्या सुशिक्षित विचारी माणसांनी यावर बोललं पाहिजे, सामूहिक आवाज बुलंद केला पाहिजे. मी माझ्या काही कथातून याला वाचा फोडून दाहक वास्तवाचा आरसा वाचकांपुढे धरत माझे लेखकिय कर्तव्य पार पाडलं आहे. मराठीतले अनेक लेखक-कवी मोठ्या ताकदीनं प्रश्न मांडत आहेत. प्रज्ञा दयो पवारांचं ‘खैरलांजी'वरचं नाटक, अरविंद जगतापांचं 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' आणि शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीम मोहल्ला' या राजकुमार तांगडेच्या नाटकाचं आपण या दृष्टीने स्वागत केलं पाहिजे. या कलाकृती आपल्या सामाजिक दस्तावेज आहेत, त्यतिल धगधगतं दलित अत्याचाराचं वास्तव संपून या कलाकृती कालबाह्य वे इतिहास जमा जितक्या लवकर होतील तितकं या लेखकांना समाधान वाटेल व त्यांच्या लेखणीचं सार्थक होईल! पण - पुन्हा तोच शायरे आझम साहिर लुधियानवीचा प्रश्न मला पडतो. 'वो सुबह कभी तो आयेगी?' त्यासाठी आमचा जात वास्तवाचा अंधार तरी आम्हास दाखवू द्या. बंडखोरीच्या काही मशाली खनातून पेटवू द्या व समाजाला व व्यवस्थेला दाखवू द्या, की हा अंधार अजूनही किती घनदाट- घनगर्द आहे व तो दूर करणारी पहाट किती दूर आहे ! हे करायच यासाठी की संघर्ष करायला अधिक बळ मिळावं!

 आता मी आणखी एका अस्वस्थ समाजघटकाबद्दल बोलणार आहे. भारताच्या लोकसंख्येचा अठरा टक्के असणा-या मुस्लीम समाजाच्या प्रश्नाकडे मला तुमचे लक्ष वेधू द्या. मी मूळचा मराठवाड्याचा आहे, त्यामुळे साहजिकच हिंदूमुस्लीम धर्मीयांच्या 'मिलीजुली', 'गंगा-जमनी' संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. भारताची धर्मावर आधारित झालेली फाळणी हे एक ऐतिहासिक वास्तव आहे, पण भारत ही आपली भूमी मानून इथं राहणा-या मुस्लिमांकडे आपल्या हिंदू समाजातील काही तथाकथित कट्टर लोक शंका व विद्वेषानं आजही का पाहत आहेत? सविधानानं त्यांनाही समान नागरिकत्व में सर्व मूलभूत अधिकार दिले आहेत, पुन्हा त्यांना आपली भाषा व संस्कृती व धर्म जपण्याचे पण अधिकार दिले आहेत. पण एका बाजूला त्यांचा मतासाठी अनुनय करणारे पक्ष तर दुसरीकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / २३