पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणारे - त्यांना प्रतिनिधित्व नाकारणारे पक्ष, या दोन्हींनी मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय केला आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांना असुरक्षित केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या 'आयडेंटिटी'चा प्रश्न जीवन मरणाचा बनला आहे. पुन्हा या समाजाला, जो हिंदू धर्मीयांशी गुण्यागोविंदाने नांदत आहे व बहुसंख्य हिंदू समाजही त्यांच्यासह शांततामय सहअस्तित्वानं राहत आहे, त्या समाजाला सौदी अरेबिया - पाकिस्तान - सिरिया व इराक आदी देशातून पैदा झालेल्या व ज्यानं अक्राळविक्राळ असं दहशतवादाच हिंस्ररूप 'सलाफी बहाबीझम' या बहुसंख्य इस्लामी धर्मगुरूंनाही पसंद नसलेल्या कट्टर तत्त्वज्ञानाची कास धरीत धारण केलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे संशयानं पाहिलं जात आहे. हेही मान्य केलं पाहिजे की, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून व ‘इस्लाम खतरे में है'ची आरोळी ठोकत काही कट्टर संस्था मुस्लीम तरुण वर्गास भडकवत आहेत, त्याला काही बेकार सुशिक्षित मुस्लीम तरुण बळी पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.पण त्यामुळे संपूर्ण समाजाकडे संशयानं पाहत त्यांना दुषणं देणं कितपत योग्य आहे? मागील काही काळात गोहत्या बंदीचं उल्लंघन केलं या संशयावरून किंवा घरी बीफ ठेवलं म्हणून काही मुस्लिमांना जमावानं सरेआम मारलं आहे, हे किती भयानक आहे? माणसानं माणसाला धर्म-पंथजातीवरून मारणं हे निषेधार्ह आहे. ती आपली भारतीय संस्कृती नाही. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात' असं ‘पसायदाना'मध्ये ज्ञानेश्वर माउलीनं ‘विश्वात्मक देवा'कडे प्रार्थना करीत प्रसाद मागितला होता. माणसाप्रमाणे प्राणिजात, अगदी किडा-मुंगीचंही अस्तित्व मान्य करणारा भारतीय समाज आहे. त्याची ही सहिष्णू प्रवृत्ती आहे, मग त्यातल्या मूठभर वर्ग का कट्टर होतो आहे? का माणसं मारण्याइतपत क्रूर-अंध होतो आहे?
 ही गुजराथची भूमी आहे, म्हणून मला या संदर्भात महात्मा गांधी काय म्हणाले होते, याची आठवण करून द्यावीशी वाटते. त्यांच्या विपुल लेखनातील काही विचारांचं 'इन्स्पायरिंग थॉट्स' हे मीरा जोहरीनी संकलित केलेल्या पुस्तकातील खालील विचारांकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणतात,
 'Free India will be no Hindu raj. It will be Indian raj based not on the majority of any religious sect or community but on the representative of the whole people without distinction of religion'
 अर्थात ‘स्वतंत्र भारत हे हिंदू राष्ट्र असणार नाही. ते कुण्या बहुसंख्याक पंथ किंवा समाजाचं राज्य नसेल तर धर्माधारित भेदभाव न करता सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करणारं भारतीय राज्य असेल !'

 आपण गांधीजींना राष्ट्रपिता मानतो, आदर्श मानतो, तर मग त्यांचं सर्व

२४ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन