पान:संपूर्ण भूषण.djvu/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ४८ कछवाहे गौर और रहे अटल चकत्ता को चमाऊ धरि डरि कै । अटल सिवाजी रह्यो दिल्ली को निदरि धीर धरि ऐड धरि तेग धरि गढ़ धरिकै ॥ १३४ ॥ \/ देशोदेशींचे राजे आपापले देश औरंगजेबास देऊन व स्वतः त्याची प्रजा बनून निश्चित झाले. भूजण म्हणतो, ( उदेपूरचा ) राणा आपला क्षत्रियत्वाचा बाणा सोडून औरंगजेबाची चाकरी पत्करून सुरक्षित राहिला. हाड़ा, राठोड, कछवाहे, गौर व आणखी कित्येक राजे औरंगजेबास भिऊन त्याजवर चंवन्या ढाळीत स्वस्थ बसले; पण शिवाजी विल्लीपतीला तुच्छ लेखून धैर्य धारण करून अपिला बाणा संभाळून किल्ले हस्तगत करून निरामय झाला. (१३४) ३० प्रतिवस्तूपमा-लक्षण, दोहा वाक्यन को जुग होत जहँ, एकै अरथ समान । जुदो जुदो करि भाषिए, प्रतिवस्तूपम जान ॥ १३५ ॥ उपमान आणि उपमेय वाक्याचा निरनिराळ्या शब्दांनी एकच भाव जाणविला जातो तेथे ‘प्रतिवस्तूयमा'अलंकार जाणावा. (१३५) उदाहरण-लीलावती छंद मद जल धरन द्विरद बल राजत, बहुजल धरन जलद छवि साजै । पुहुमि धरन फनिनाथ लसत अति, तेज धरन ग्रीषम रबि छाजै ॥ खरग धरन सभा तहँ राजत, रुचि भूषन गुन धरन समाजै । दिल्ली दलन दख्खन दिसि थम्मन, पेड़ धरन सिवराज विराजै ।। १३६ ॥ हत्तीचे बळ त्याच्या गंडस्थळाँतून मदस्राव होतो तेव्हां शोभते; मेघ पाण्याने गच्च भरलेले असता त्यांची शोभा आहे. पृथ्वी धारण केल्यामुळे शेष आणि प्रखर तेजामुळे ग्रीष्मऋतूतील सूर्य शोभा पावतो. भूषण म्हणतो, गुणग्राहक समाजांत (शिवाजीचे दरबारात) खडूग धारण करणा-याची