पान:संपूर्ण भूषण.djvu/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ शिवराज-भूषण पाइयतु है। दोहाई कहे ते कवि लोग ज्याइयतु अरु दोहाई कहे ते अरि लोग ज्याइयतु है ॥ १२८॥ हे शिवराज ! तुम्ही आपल्या सद्णन यांना (सज्जनांना) बद्ध करिता, तर त्यांना (शत्रूना) दोरांनी बांधून आणता. यांचे (सज्जनाँचे) पाय धरून रोज ध्यान करता, तर त्यांना (शत्रूना) शोधून पकडून आणता; भूषण म्हणतो, हे शिवाजी महाराज ! तुमच्या ठिकाणी स्नेह आणि क्रोध ही दोन्ही एक सारखीच दिसून येतात. दोहाई (कविता) म्हणणारांना (कवींना) वाचविता ( आश्रय देता ) आणि दुहाई ( शरण ) म्हणतच शत्रूना बच विता. (१२८) | २८ दीपक-लक्षण, दोहा व अवयन को धरम, जहँ बरनत है एक । दीपक ताको कहत हैं, भूषन सुकवि विवेक ।। १२९ ॥ उपमेय उपमानचा एकच धर्म जेथे वर्णन केला जातो, तेथे ‘दीपक अलंकार जाणावा. (१२९) उदा०–मालती सवैया कामिनि कंत सो जामिनि चन्द सो दामिनि पावस मेघ घटा सों। कीरति दान सो सूरति ज्ञान सो प्रीति बड़ी सनमान महा सौ ॥ भूषन भूषन सो तरुनी नलिनी नव पूषन देव प्रभा स । जाहिर चारिहु ओर जहान लसै हिन्दुवान खुमान सिवा सौ ॥ १३० ॥ भूषण म्हणतो, ज्याप्रमाणे स्री पतीच्या थोगाने, रात्र चंद्राने, बीज वर्षकालीन मेघपटलाने, कीर्ति दानाने, रूप (किंवा श्रुति ) ज्ञानाने, प्रीति सन्मानाने, तरुणी भूषणाने, कमलिनी सूर्याच्या नवप्रभेने जशी शोभते, त्याप्रमाणे जगत (हा ) हिंदूंचा समुदाय खुमान ( आयुष्मान ) शिवाजीमुळे चहूंकडे शेाभत आहे. (१३०)