पान:संपूर्ण भूषण.djvu/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज-भूषण १४ उदाहरण-दोहा और नृपति भूषन कहूँ, करें न सुगम काज । साहि तनै सिव सुजस तो, करै कठिनऊ आज ॥ १२२ ॥ * भूषण म्हणतो, अत्यंत सोपे असे काम असले तरी इतर राजे करू शकत नाहीत; पण हे शहाजीपुत्र शिवराज ! तुझे सुयश कठिणतिले कठिण काम तात्काल करिते. (१२२) उदा० २ रें-मालती सवैया जीत लई वसुधा सिगरी घमसान घमंडकै बीरन हू की। भूषन भौसिला छीन लई जगती उमराव अमीरन हू की । साहि तनै सिवराज की धाकनि छुटि गई धृति धीरन हू की । 'मीरन के उर पर बढी यो जु भालि गई साध पीरन ह की ॥१२३॥ भूषण म्हणतो, शिवाजीने मोठमोठ्या वीरांशी लढून सर्व पृथ्वी जिंकून घेतली; आणि त्यांचा ( बीचा ) अभिमान देखील नाहींसा केला. ह्या भोसल्याने सर्व अमीरउमरावची (जगती) संस्थाने हिसकावून घेतली. शहाजी पुत्र शिवाजीच्या धाकाने मोठमोठ्या धैर्यशाली पुरुषाचे धैर्य गन गेले. (सर्व) सरदारांची मने इतकीं दुःखित होऊन गेली आहेत की, त्यांना आपल्या पी-पैगबरचे देखील स्मरण राहिले नाहीं. (१२३) २७ तुल्ययोगितालक्षण, दोहा तुल्य जोगिता तहँ धरम, जहँ बरन्यन को एक। कहूँ अवरन्यन को कहत, भूषन बरनि विवेक ॥ १२४ ॥ अनेक उपमेये आणि उपमान यांचा एकच धर्म जेथे सांगितला जातो तेथे ‘तुल्ययागिता' अलंकार जाणावा. (१२४) मनहरण |चढत तुरंग चतुरंग साज सिवराज चढ़त प्रताप दिन दिन अति अंग में। भुवन चढ़त मरहद्दन के चित्त चाव खग्ग