पान:संपूर्ण भूषण.djvu/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ४२ कारणाचे वर्णन होत असतच जेथे कार्य होऊन जाते तेथे चंचलाउतशयोक्ति अलंकार जाणावा. (११५) उदा०-दोहा आयो आयो रसुलत ही, सिव सरजा तुव नाँव ! बैरि नारि दृग-जलन स, बूडि जात अरगांव ॥ ११६॥ हे सर्जा शिवाजी ! तू आलास' असे तुझे नाव ऐकतच शत्रुस्त्रियांच्या नेत्रांतील अश्रुप्रवाहांनी शत्रूचीं गांवें बुडून जातात. (११६) उदा० २ रें--कवित्त मनहरण गढ़नेर गढ़ बँदा भागनेर बीजापुर नृपन की नारी रोय हाथन मलति हैं। करनाट हबस फिरंग हूँ बिलायत बलख रूम अरि तिय छतियाँ दलति हैं ।। भूषन भनत साहि तने सिवराज एते मान तव धाक आगे दिसा उबलति हैं। तेरी चमु चलिबे की चरचा ले ते चक्रवर्तन की चतुरंग चमू बिचलीत है ॥ ११७॥ नगरगट, चांदा, हैद्राबाद, बिजापूर येथील राजांच्या स्त्रिया रडून रडून हात चोळतात; तर कर्नाटक, हसाण वे फिरंगाण (फिरंगी-युरोपियनीचा देश ) विलायत (तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान इत्यादि यावनी देश), बलख, रूम येथील शत्रुखिया ऊर बडवून घेतात; भूषण म्हणतो, शहाजी पुत्र शिवराज ! ह्याप्रमाणे तुझ्या धाकाने सर्व दिशा गडबडून गेल्या आहेत. तुझ्या सैन्याच्या हालचालीची चर्चा ऐकतच चक्रवर्ती औरंगजेबाच्या सैन्याची गाळण उडून जाते ( फाटाफूट होते ), (११७) २५ अत्यन्तातिशयोक्ति-लक्षण, दोहा जहाँ हेतु ते प्रथमही, प्रगट होत है काज । अत्यन्तातिसयोक्ति सो, कहि भूषन कविराज ॥ ११८ ॥