पान:संपूर्ण भूषण.djvu/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ श्रीशिवराज-भूषण


पश्चिमेपावेत जे जे राजे होते ते दिल्लीपतीच्या आश्रयाची वांछा करून होते; पण जग जिंकणाच्या ह्या (अलमगीर) औरंगजेबास शिवाजीनें जिंकिलेंः शिवाजीची ही निराळीच रीत जगतात दिसून आली. (११२) २३ अक्रमातिशयोक्ति-लक्षण, दोहा जहाँ हेतु अरु काज मिले, होत एक ही साथ। अक्रमातिसय-जाते सो, कहि भूपन कविनाथ ॥ ११३ ॥ जेथे कारण आणि कार्य एकत्र होतात तेथे ‘अक्रमाातशयोक्त अलंकार होतो. (११३) उदा०-कवित्त मनहरण उद्धत अपार तव दुंदुभी धुकार साथ लंधै पारावार बालवृन्द रिपु गन के । तेरे चतुरंग के तुरंगन के नँगे रज साथ ही उडात रजपुंज है परन के ॥ दृच्छिन के नाथ सिवराज ! तेरे हाथ हैं धनुष के साथ गढ़ कोट दुरजन के। भूषण असीखें, तोहि करत कसीसें पुनि बानन के साथ छूटें प्रान तुरकन के ॥ १४ ॥ तुझ्या रणभेरींचा प्रचंड भीषण ध्वनि ऐकतच शत्रूची कुटुंबें ( बायका-मुलें ) समुद्रपार होऊ लागतात. तुझ्या चतुरंग सैन्यातील घोडे धुळीन भरतच शत्रूची राज-श्री उडून जाते. हे दक्षिणाधिपति शिवराज ! तुझ्या हाताँत धनुष्य येण्याचा अवकाश कीं, शत्रूचे किल्ले हस्तगत झाले म्हणून समजावें. भूषण म्हणतो, तुं बाण (कर्ण) ओढतच (लोक तुला) आशीर्वाद देतात व तुझ्या हातून बाण सुटतच तिकडे तुकचे प्राण सुटतात. (११४) २४ चंचलातिशयोक्ति-लक्षण, दोहा जहाँ हेतु चरचाहि मैं, काज होत तत्काल। चंचलातिसय-उक्ति सो, भूषन कहत रसाल ॥ ११५॥ ...