पान:संपूर्ण भूषण.djvu/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ श्रीशिवराज-भूषण साहि तनै सरजा खुमान सलहेरि पास कीन्ह कुरुखेत खीझ मीर अचलन स । भूषन भनत बलि करी हैं अरीन धर धरनी पै डारि नभ प्रान दै बलन सा ॥ अमर के नाम के बहाने गो अमरपुर चन्दावत लरि सिवराज के दलन । कालिका प्रसाद के बहाने ते खवायो महि बाबू उमराव राव पसु के छलन सो ॥ ९७ ॥ शहाजीपुत्र शिवाजी सजने सालेरी जवळ ( मोगलाच्या ) धुरंधर सरदारांशी मोठे घनघोर युद्ध केले. भूषण म्हणतो, शत्रूची धडे पृथ्वीस आणि प्राण आकाशास बाले दिले. अमरसिँह नवाचा चन्दावत सरदार शिवाजीच्या सैन्याशी लढून आपल्या नावाच्या विषाने अमरपुरास ( वैकुंठास ) गेला. कालिकेच्या प्रसादाच्या मिषाने बाबु उमराव आणि इतर कित्येक वरूपी पशूचे बलि पृथ्वीस खाऊ घातले. (९७) | २० उत्प्रेक्षा–लक्षण, दोहा आन बात को आन मैं जहँ सम्भावन होय । वस्तु हेतु, फल युत कहत, उत्प्रेक्षा है रसोय ॥९८ ॥ एका वस्तूंत अन्य वस्तुची सम्भावना करून वस्तूचा हेतु फलासुद्ध सांगितला जातो तेथे ‘उत्प्रेक्षा' अलंकार जाणावा. (९८) उदा०–वस्तूत्प्रेक्षा, मालती सवैया दान आयो दगा करि जावली दोह भयारो महामद भाग्यो। भूपन बाहुबली सरजा तेहि मांटिबे को निरसंक पधाग्यो । बाछ के घाय गिरे अफजलुहि ऊपरही सिवराज निहायो । दाबि यो बैठो नरिन्द अरिन्दहि मानो मयन्द गयन्द छान्यो ॥९॥ मदोन्मत्त आणि अतिभयंकर असा अफजलरूपी राक्षस दगा करण्यासाठी जावळीस आला. भूषण म्हणतो, बाहुबली सर्जा शिवाजी त्या (अफजलखाना )च्या भेटीस निःशंकपणे मेला. बिछब्याच्या (वाघनखाच्या)