पान:संपूर्ण भूषण.djvu/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओशिवराज-भूषण अरिंगजेब आपल्या वजिरास रात्री पडलेले स्वप्न सगू लागलाः-- किल्ल्याच्या (अथवा दुर्गाभवानीच्या ?) आणि बलिष्ठ पंजाच्या जोरावर सरजाने मला रणांत जिंकले. वजिराने विचारले, ११ ‘सरजा' । म्हणजे कोण ? शिवाजीमहाराज की काय ?” भूषण म्हणतो, वजिराचे हे म्हणणे ऐकून औरंगजेब लाजून चूर झाला व म्हणू लागला, “तसे नव्हे, 'सरजा' म्हणजे सिंह ( व शिकार खेळत असतांना सिंहाने मला, जिंकिले.” ) (९३,९४) । १९ कैतवापन्हुत-लक्षण, दोहा जहँ कैतव, छल, व्याज मिसि, इन सा होत दुराव।। कैतव पन्हुति ताहि स, भूषन कहि सतिशय ॥ ९५ ॥ एकादी वस्तू कपट, प्रतारणा, व्याज यांच्या मिषाने जेथे लपविली जाते तेथे ‘कैतवापन्हुति' अलंकार जाणावा. (९५) उदा०–मनहरण दंडक साहिन के लिच्छक सिपाहिन के पातसाह संगर मैं सिंह कैसे जिनके सुभाव हैं । भूषन भनत सिव सरजा की धाक ते वै काँपत रहत चित गहत न चाव हैं । अफजल की अगति सासता की अपगति बहलोल विपति सी डरे उमराव हैं ॥ पक्का मतो करि कै मलिच्छ मनसब छोडि मक्का ही के मिसि उतरत दरियाव हैं ॥ ९६॥ भूषण म्हणतो, सर्जा शिवाजी बादशहांचा शासक, शिपायांचा राजा आणि समरगणांत सिंहाप्रमाणे निर्धास्त वावरणारा आहे; त्यामुळे ते ( शहा व शिपाई ) थरथरी पितात. त्यांच्या ठिकाणी उत्साह कसा तो रहातच नाहीं. अफजलखान व शायस्तेखान यांची झालेली दुर्गति व बहलोलखानावर कोसळलेली विषात पाहून सरदार लोक भयभीत झाले आहेत. म्लेंच्छनीं आताँ पक्का निश्चय करून आपल्या मनसबी सोडून मकेस जाण्याच्या मिषाने समुद्दपार होण्यास सुरवात केली आहे. (९६) - -