पान:संपूर्ण भूषण.djvu/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।।२। ।। ३१ | एके वेळी सर्व सैन्य सज्ज करून औरंगजेब शिकारीस निघाला असता लोकांनीं एकीकडून ‘सरजा ( सिंह ) येतो आहे, सांभाळा' असा गलबला केला; भूषण म्हणतो, औरंगजेब ‘सरजा' म्हणजे शिवाजीच आला असे समजून मूर्च्छित झाला. तेव्हां शिकारी लोकांनी धावून येऊन ‘शिवाजी नव्हे, सिंह' असे समजाविल्यावरून निश्चेष्ट झालेल्या औरंगजेबास उठावले. (९०) १८ छेकापन्हुति-लक्षण, दोहा । जहाँ और को संक करि, साँच छिपावत बात । छेकापन्हुति कहत है, भूषण कवि अवदात ॥९१॥ अन्य वस्तूची शंका घेऊन खरी वस्तू लपविली जाते तेथे ‘छकापन्हुति' अलंकार जाणावा. (९१) उदा०-दोहा तिमिर बंस हर अरुन कर, आयो सजनी भोर ?। सिव सरजा, चुप रहि सखी, सूरज कुल सिरमौर ॥२२॥ दोन मैत्रिणींचे परस्पर संभाषणः--- पहिली दुसरीस म्हणतेः-हे साजणी ! अंधःकाराचा नाश करणारा हा अरुणोदय होत आहे. दुसरी पहिलीस म्हणतेः-अग, चुप बैस; हा अरुणोदय नव्हे, तैमूरवंशाचे निर्दलन करणारा सूर्यकुलमणी सरजा शिवाजी आहे. (९२) उदा० २ रें-दोहा दुरगहि बल पंजन प्रबल, सरजा जिति रन मोहिं ।। औरंग कहै देवान सों, सपन सुनावत तोहि ॥९३॥ सुनि सु उजीरन यों कह्यो, * सरजा सिव महराज ? ।” भूषन कहि चकता सकुचि, “नाही, सिकार मृगराज ॥९४॥ : शि. ५....३