पान:संपूर्ण भूषण.djvu/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ श्रीशिवराज-भूषण छाती माहिं छेवा है। जान्यो न परत ऐसे काम है करत । कौऊ गंधरव देव है कि सिद्ध है कि सेवा है ॥७९॥ । | स्नानगृहाकडे येताना शिवाजीनें जो क्रोधाविर्भाव दाखविला त्यावरून तो औरंगजेबाचा प्राणच घेतो की काय असे वाटू लागले. शिवाजी, वचनभंग झाल्यामुळे आग्न्यातील सात चौक्या ओलांडून पहा-यातुन सुरक्षितपणे निसटून घराकडे आला; व त्याने नर्मदा नदी ही आपल्या राज्याची सीमा केली. भूषण म्हणतो, त्या (शिवाजी)ने चहूं दिशांचे आधिपत्य (पादशाही) असावे अशी इच्छा केली; तेव्हा चशताई बादशहा (औरंगजेबाच्या, छातींत प्रहार केल्यासारखे झाले. शिवाजी आपली कामें अशा रीतीने करतो की, ती गंधर्व, देव अथवा सिद्ध यांनी केली की शिवाजाने केली असावी हे समजून येत नाही. (७९) । १४ शुद्धापन्हुति-अक्षण, दोहा आन बात आरोपिए, साँची बात दुराय ।। शुद्धापन्हुति कहत हैं, भूषन सुकवि बनाय ॥ ८० ॥ खरी गोष्ट (वस्तु) लपवून तिजवर दुसरीचा आरोप केला जातो तेर्थे ‘शुद्धापन्हुति' अलंकार जाणावा. (८०) उदा०–कवित्त मनहरण चमकत चपला न, फेरत फिरंगै भट, इन्द्र को न चाप रूप बैरष समाज को । धाए धुरवा न, छाए धूरि के पटल, मेघ गाजिबो न बाजिब है दुन्दुभि दराज को ॥ भौंसिल के डरन डरानी रिपु रानी कहैं, पिय भजौ, देखि उदी पावस के साज को । धन की घटा न, गज घटनि, सनाह साज भूषन भनत आयो सेन सिवराज को ।। ८१ ॥ 1. ही विजेची चमक नव्हे, तर वीर आपल्या तरवारी फिरवीत आहेत; हैं। इन्द्रधनुष्य नव्हे, हा सैन्याचा झेंडा आहे; हे ढग नव्हेत, तर (सैन्याच्या चालण्याने उडालेली) धूळ आहे; ही मेघची गर्जना नव्हे तर (सैन्या