पान:संपूर्ण भूषण.djvu/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ अाशवराज-भूषण. स्वतः शक्तिसंपन्न असून इतरांनाही शाक्त देणान्या अशा आहेत त्यांचे) कोण वर्णन करू शकेल? (७३) ११ स्मृति-लक्षण, दोहा सम सोभा लखि आन की, सुधि आवत जेहि ठौर। स्मृति भूषन तेहि कहत है, भूषन कवि सिरमौर ॥ ७४ ॥ समानगुणधर्मामुळे जेथें अन्य वस्तूची आठवण होते तेथे ‘स्मृति' अलंकार जाणावा. (७४) उदा०-कवित्त मनहरण | तुम सिवराज ब्रजराज अवतार आजु तुमही जगत काज पोषत भरत हो। तुम्हें छोडि याते काहि बिनतो सुनाऊँ मैं तुम्हारे गुन गाऊँ तुम ढीले क्यों परत हौ ? ।। भूषन भनत वहि कुल मैं नयो गुनाह नाहक समुझि यह चित मैं धरत हौ । और बाँभनन देखि करत सुदामा सुधि मोहिं देखि काहे सुधि भृगु की करत हो ? ॥ ७५ ॥ हे शिवराज ! तुम्ही ब्रजराज श्रीकृष्णाचे अवतार आहाँ, कारण साँप्रत जगताचे भरणपोषण-कार्य तुम्हीच करीत आहो; म्हणून तुम्हाला सोडून मी दुस-याची विनवणी कशाला करूं? मी तुमचेच गुणगान करितों पण तुम्ही असे शिथिल की होती ? भूषण म्हणतो, मी त्याच फुलातील (ब्राह्मण वर्गातील ) एक नवीन अपराधी असा आपण विनाकारण गैरसमज करून घेतला आहे. कारण, (मला माहीत आहे कीं), इतर पुष्कळ ब्राह्मणांना पाहून आपणांस सुदामाची आठवण होते; पण मला पाहताँच आपणास भृगु ऋषीची स्मृति होते याचे काय कारण ? (७५) १२ भ्रम-लक्षण, दोहा आन बात को आन मैं, होत जहाँ भ्रम आय। तास भ्रम सब कहत है, भूषन सुकवि बनाय ॥ ७६ ॥ --