पान:संपूर्ण भूषण.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० ५ ५ ॥ ३१ ॥ २२ भूषण म्हणतो, ह्या यवन-साम्राज्यरूप विराट् कायेचे शूर बादशहा ‘मन’ होत; औरंगजेब बादशहा ‘मस्तक', ज्याच्या बाहुबलाचा पराक्रम स्थिर असा अब्बासशहा हा 'हृदय', आदिलशहा आणि कुतुबशहा हे ज्याचे *उभय बाहु', यवन सरदार हे 'पाय' व इतर तुर्के हे शेष ‘अवयव'; अशा ह्या जुलुमी कायेने पृथ्वीवर अवतार धारण करून जगाला शासन केले. कलियुगांतील त्या दुष्ट झायेचें सिंहसमान शूर शिवाजीने साहसरूपी खड्ग घेऊन खंडन केले. (६२) उदाहरण ३ रे-कवित्त मनहरण * सिह थरि जाने बिन जावली जंगल भठी हठी गज एदिल पठाय करि भटक्यौ । भूषन भनत देखि भभरि भगाने सब हिम्मति हिये मैं धारि काहुदै न हटक्यो । साहि के सिवाजी गाजी सरजा समत्थ महा मद्गल अफजलै पंजा बल पटक्यो। ता बिगिरि व्है करि निकाम निजधाम कहूँ अकुत महाउत सुकुस लै सटक्यौ ॥ ६३॥ जावळीच्या जंगलांत सिंह राहण्याची गुहा आहे हे न समजून दुराग्रहीं आदिलशहाने ( अफजलरूपी ) हत्तीस पाठवून चूक केली. भूषण म्हणतो, ( त्या अफजलखानास पाहून ) सर्व भयभीत होऊन पळून गेले. कोणीदेखील मनति धैर्य धरून त्याला अडवू शकला नाहीं; पण शहाजीच्या धर्मवीर समर्थ शिबाजी सरजानें मदोन्मत्त अफजलखानास पंजाच्या जोरानें। पटकले ( मारिलें ). त्या अफजलरूप हत्तीवाचून या छूतखान रूपी माहूत अंकुश घेऊन नुसताच आपल्या ठिकाणी पळून गेला. (६३) न्यूनाधिक रूपकाचे प्रकार-कवित्त मनहरण घटि बढि जहँ बरनन करै कारकै दुहुन अभेद।। भूषन कवि औरौ कहत द्वै रूपक के भेद् ॥ ६४ ॥ उपमेय व उपमान यांचा अभेद न्यूनाधिक भावानें जेथे वर्णन केला जातो तेथे ‘रूपकालंकार' होतो. (६४) = = =