पान:संपूर्ण भूषण.djvu/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ श्रीशिवराज भूषण बिहसत, निदरत, हँसत जहँ, छबि अनुहरत बखानि । सत्रु मित्र इमि औरऊ लीलादिक पद जानि ॥२८॥ संवाद, निरादर, हास्य, शोभावलोकन, तसेच शत्रु, मित्र इत्यादींचें । व त्याचप्रमाणे इतर विषयांचे वर्णन ज्या पदनी केले जाते त्यांस लीलादिक अदं म्हणतात, (५८) • उदाहरण–कवित्त मनहरण | साहि तनै सरजा सिवा की सभा जामधि है मेरु वारी सुर की सभा को निदति है। भूषन भनत जाके एक एक सिखर ते केते धौं नदी नट्स की रेल उतरति है ॥ जोन्ह को हँसति जोति हीरा मान मंदिरन कंदरन मैं छबि कुहू कि उछरति है । ऐसो ऊँचो दुरग महाबलि को जामैं नखताबली स बहस दिपावली धरति है ।।५९॥ शहाजीपुश शिवाजीची ( रायगडावरील ) सभा मेरुपर्वतावरील देवसभेला तुच्छ लेखणारी अशी आहे. भूषण म्हणतो, ह्या (रायगडा )च्या एकेका शिखरापासून कित्येक नदीनचे प्रवाह ध ध वाहत आहेत. (किल्ल्यावरील) मंदिरातील हिरेमाणिकादि रत्नची प्रभा चंद्रप्रकाशास छाजविणारी आहे. कारण, ह्या प्रभेने ( गडावरील व भोवतालील ) द-या- खो-यातील अमावास्येचा अंधार पार घालवून दिला आहे. महाबलिट अशा शिवरायाचा (रायगड ) किला इतका उंच आहे कीं (आकाशातील चमकणा-या ) तारांगणामुळे त्यादर नेहमी दीपावलीची शोभा विराजत आहे. (५९) ८ रूपक-लक्षण, दोहा जहाँ दुहुन को भेद नाही बरनत सुकवि सुजान। रूपक भूषन ताहि को भूषन करत बखान ॥६०॥ उपमेय आणि उपमान यांत जेथे अभेद वर्णन करण्यात येतो तेर्थे । रूपफालंकार' होतो. (६०)