पान:संपूर्ण भूषण.djvu/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ आशवराज भूषण उदाहरण-कवित्त मनहरण तो सम हो सेस सो तो बसत पताल, लोक ऐरावत गज सो तो इंद्रलोक सुनियै। दुरे हंस मानसर ताहि मैं कैलासधर, सुधा सुरवर सोऊ छोडि गयो दुनियै। सुर दानी सिरताज महाराज सिवराज रावरे, सुजस सम आजु काहि गुनियै? । भूषन जहाँ लौं गनौं तहाँ लौं भटक हान्यो लखिये कछु न केती बातें चित चुनियै ॥५०॥ | हे शिवराज ! तुमच्या सुयशास शेषाची उपमा देऊ तर तो पाताळात राहणारा. बरें, ऐरावताची देऊ म्हटले तर तो इंद्रलोकीं, हंसाची यावयास जाऊ तर तो दुर्गम अशा फैलास पर्वतावर मानससरोवरी राहणारा, अमृताची उपमा देऊ म्हटले तरी ते देवलोकात देवाजवळ. हे दानशूर शिवराज! तुमच्या सुयशाशी मी आत कोणाची तुलना करू ? भूषण म्हणतो, शिवराज ! तुझ्या नुकीर्तीस साजेलशी उपमा शोधण्याचा पुष्कळसा प्रयत्न केला, मनाने कित्येक (उपमा) निवडूनही काढल्या; परंतु (योग्य तुलना न झाल्यामुळे) अखेर मलाच हार खावी लागली. (५०), * ५। उदा० २ रें-मालती सवैया कुंद कहा पय वृद कहा अरु चंद कहा सरजा जस आगे ?। भूषन भानु कृसानु कहाऽब खुमान प्रताप महीतल पागे १ ॥ राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रन मैं अनुरागे ?। बाज कहा मृगराज कहा अति साहस मैं सिवराज के आगे ॥२१॥ | कुंद, दूध आणि चंद्र यांची शुभ्रता शिवरायाच्या यशासमोर काय होय ? पृथ्वीवर पसरलेल्या (चिरजीव) शिवरायाच्या प्रखर प्रतापापुढे सूर्य व अग्नि यांच्या तेजाचा काय पाड ? समप्रियतेमध्ये दाशरथी राम, परशराम आणि बलराम हे देखील शिवरायांच्या मागेच होत; व धाडस पाहिले असता बाज (बहिरी ससाणा-पक्ष्यविर झडप घालणारा) व सिंह हे शिवरायापुढे तुच्छ होत. (५१) शि. भु....२