पान:संपूर्ण भूषण.djvu/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

== उदाहरण-कवित्त मनहरण चंदन मैं नाग, मदभन्यो इंद्रनाग, विषभरो सेसनाग कहै। उपमा अबस को ? । भोर ठहरात, न कपूर बहरात, मेघ सरद् उड़ात बात लागे दिसि दस को ॥ शंभु नीलग्रीव, भौंर पुंडरीक ही बसत, सरजा सिवाजी सन भूषन सरस को ?। छीरधि मैं पंक, कलानिधि मैं कलंक, याते रूप एक टंक ए लहै न तव जस को ॥१८॥ या छंदांत चंदन, ऐरावत, शेष, कमल, चंद्र आदि उपामित पदार्थांत काहींना कांहीं दोष दाखवून शिवराजयश अनुपमेय आहे असे कवीने दाखविले आहेः-- चंदन सुवासिक खरा, पण सर्वांनीं बष्टिलेला; इंद्राचा ऐरावत थोर, परंतु मस्तावलेला; शेष पृथ्वी धारण करणारा परंतु विषारी; अरुणसमय निताँत रमणीय, परंतु न टिकणार; कापूर शुभ्र व सुवासिक, परंतु उडून जाणारा; मेघ जगतावर उपकार करणारे परंतु शरद्वायु लागताच दुशदिशसि फाकून जाणारे; महादेव सर्वांगीं गौर, पण विषपानानें कंठ नील, वर्ण झालेले; भ्रमर कृष्णवर्ण, पण शुभ्रफमलावरच बसणारा; एवढा मोठा क्षीरसागर, परंतु चिखलाने भरलेला; शांत व रमणीय प्रकाशदायी चंद्र परंतु कलंकित; सारांश, भूषण म्हणतो, मी विवश होऊन ( निरुपाय म्हणून ) वरील उपमा शिवराजयशाला दिल्या आहेत, त्या सदोष असल्यामुळे यत्किचित् देखील शिवराज-यशाशी तुलत नाहींत. (४८) | पंचम प्रतीप-लक्षण, दोहा हीन होय उपमेय स नष्ट होत उपमान ।। पंचम कहत प्रतीप तेहि भूषन सुकवि सुजान ॥४९॥ उपमेयामुळेच उपमान हिणकस ठरते किंबहुना नष्ट होते; असे वर्णन जेथे होते तेथे प्रतीपालंकार होतो. (हे प्रतीपाचे पाँचवें लक्षण ). (४९)