पान:संपूर्ण भूषण.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भषण दुसरे उदाहरण मालती सवैया सासता खाँ दुरजोधन सो औ दुसासन सो जसवंत निहायो । द्रोन सो भाऊ करन्न करन्न सो और सबै दल सो दल भन्यो। ताहि बिगोय सिवा सरजा भनि भूषन औनिछता यो पछान्यो । पारथ के पुरुषारथ भारथ जैसे जगाय जयद्रथ माग्यो॥३५॥ ( औरंगजेबाकडील सरदार शाहिस्तेखान दुर्योधनाप्रमाणे, जसवंतसिंग दुःशासनाप्रमाणे, भाऊसिंह द्रोणाचार्याप्रमाणे व करणसिंह कर्णाप्रमाणे, तसेच सर्व सैन्य कौरवसैन्याप्रमाणे होते; पण शूर शिवराजाने, ज्याप्रमाणे अर्जुनाने महान् पराक्रम करून जयद्रथास मारिले, आणि भारतत आपली कीर्ति जागृत ठेविली, त्याचप्रमाणे वरील सरदारांच्या हातावर तुरी देऊन अवनीछत्र आपण स्वतः हस्तगत केले. (३५) | २ लुप्तोपमा-लक्षण, दोहा । उपमा वाचक पद, धरम, उपमेयो उपमान । जामैं सो पूर्णोपमा लुप्त घटत लौं मान ॥३६॥ ज्या उपमेत उपमेय, उपमान, वाचक आणि धर्म ह्या पदाचे वर्णन असते तेथे ‘पूणपमा' व वरील चार पदपिकी एक अथवा अनेक पदांचा जेथे बोध होत नाही तेथे ‘लुप्तोपमा’ अलंधर जाणावा. (३६) उदाहरण-मालती सवैया पावक* तुल्य अमौतन को भयो, मीतन को भयो धाम सुधा को । आनँद भी गहिरो समुदै कुमुदावलि तारन को बहुधा को ॥ भूतल माह बली सिवराज भी भषन भाखत शत्रु सुधा को ।। वंदन तज त्यों चंदन कीरति सधै सिंगार बधू बसुधा को ॥३७॥ * या छंदातील उक्ति चंद्रास अनुलक्षून आहे.