पान:संपूर्ण भूषण.djvu/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण तो कनोजी ब्राह्मण, काश्यप गोत्री, यमुना कठिी असलेल्या त्रिविक्रमपूरगाँवीं सदा वास्तव्य असलेल्या 'रत्नाकरा'चा मुलगा होय. (२६) । त्या त्रिविक्रमपुर गांवीं बीरबलासारखे आर राजे आणि कवि उत्पन्न झाले व तेथेच काशीविश्वेश्वरासदृश ‘बिहारीश्वर' नामक देवता आहे.(२७) कुल सलंक चितकूटपति साहस सील समुद्र । | कवि भूषन पदवी दई हृदयराम सुत रुद्र ॥२८॥ सिव चरित्र लखि यो भयो कवि भूषन के वित्त ।। भाँति भाँति भूषननि सो भूषित करौं कवित्त ॥ २९ ॥ सुकविन हूँ की कछु कृपा समुझि कविन को पंथ ।। भूषन भूषनमय करत शिवभूषन सुभ ग्रंथ ॥३०॥ साहस आणि शील यांचा केवळ समुद्रच अशा मुलंकी वंशस्थ रुद्र (शहा) यांचे पुत्र हृदयराम यांनी ‘कवि -भूपण' ही पदवी दिली, (२८) शिवाजीचे (उज्वल) चरित्र पाहतच भूषण कवीला असे वाटू लागले की, ते चरित्रपर कावेत्त नाना प्रकारच्या (शब्द-अर्थ) अलंकारांनी सजवावें. (२९) उत्तमोत्तम कवींच्या थोडाबहुत कृपेने त्यांचा (कवींचा) पंथ समजून घेऊन भूषणाने शिव-भूषण ग्रंथ अलंकारमय केला. (३०) भूषन सब भूषननि मैं उपमहि उत्तम चाहि । याते उपमह आदि दे बरनत सकल निबाहि ॥३१॥ भूषण म्हणतो, सर्व अलंकारात उपमा अलंकार श्रेष्ठ समजून कविसंप्रदायानुसार त्याचेच प्रथम वर्णन करतो. (३१)