पान:संपूर्ण भूषण.djvu/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण भूषन सुबास फल फूलयुत छहुँ ऋतु बसत बसंत जहूँ। इमि राजदुग्ग राजत रुचिर सुखदायक सिवराज कहँ ॥२३॥ नाना प्रकारचे असंख्य पक्षी फळांच्या पक्व दशेस येण्याच्या संधानास (स्वच्छंदाने) बागेतून विहरत आहेत. कोकीळ, राघू, पारवे, मंजुळ बोल-- णाच्या मैना, चपल मोर, चातक व चकोर यांचे थवेच्या थवे कलकल शब्द करीत कीडत आहेत. कृष्णवर्ण भ्रमर पुष्पांतून मधुर रसाचे पान करून गुंजारव करीत आहेत. भूषण म्हणतो, वसंतादि साही ऋतु येथे सुवासिक फलपुष्पादि सामग्रीसह नेहमी राहतात; असा तो सुंदर व सुखदायी राजदुर्ग (रायगड) शिवराजाच्या निवासस्थानाला शोभ्रं लागला. (२३) दोहा तहँ नृप रजधानी करी जीति सकल तुरकान । सिव सरजा रुचिदान में, कीन्ह सुजस जहान ॥ २४ ॥ तेथे (रायगडास) राजा (शिवाजी)ने सर्व यवनांना जिंकून राजधानी केली; आणि लोकचे इच्छित पुरवून जगताँत उत्तम यश संपादन केले.(२४) कविवंश-वर्णन देसन देसन ते गुनी आवत जाचन ताहि । तिनमै आयो एक कवि भूषन कहियतु जाहि ॥ २५ ॥ दुज कन्नौज कुल कस्यपी रतनाकर सुत धीर । बसत त्रिविक्रमपुर सदा तरनि तनूजा तीर ॥ २६ ॥ बीर बीरबल से जहाँ उपजे कवि अरु भूप।। देव बिहारीश्वर जहाँ विश्वेश्वर तद्रूप ॥२७॥ (शिवरायाची रुचिदानामुळे सर्वत्र ख्याति झाली). त्या प्रसिद्धीवर देशतिराहूम गुणी लोक त्याकडे याचना करण्याकरिता येऊ लागले; त्यातच भूषण' म्हणविला जाणारा एक कवि आला. (२५)