पान:संपूर्ण भूषण.djvu/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

---




एरवीं वृक्षलतच्या गर्दै छायेमुळे पडलेल्या अंधाराने दिसत नाहींत.) चारहि विशंकडे पहा; चंपा, चमेली, उत्तम चंदन, रायवळा, लवंगा, वेलदोडे, केळीं यांची लाखों झाडे लागून गेली आहेत. (२०) कहुँ केतकी कदली करौंदा कुद अरु करवीर हैं। कहुँ दाख दाडिम सेब कटहल तूत अरु जंभीर हैं ॥ कितहुँ कदंब कदंब कहुँ हिताल ताल तमाल हैं। पीयूष ते मीठे फले कितहुँ रसाल रसाल हैं ॥ २१ ॥ कुठे केतकी, केळी, कण्हेरी, कुंद, करवंद तर कुठे द्राक्ष, दाळिंब, सफर- । चंद, फणस, तुते, कदंबाचे समूह, तर कित्येक ठिकाणी सुपारी, ताड, तमाल, हिंताल (फटिताड) इत्यादि गगनचुंबित वृक्ष लागून राहिले आहेत. कुठे अमृतापेक्षाही मधुर व रसाळ फळे असणारे आम्रवृक्ष आहेत. (२१) पुन्नाग कहुँ कहुँ नागकेसरि कतहुँ बकुल असोक हैं। कहुँ ललित अगर गुलाब पाटल पटल बेला थोक है। कितहुँ नेवारी माधवी सिगारहार कहूँ लसैं ।। जहँ भॉति भाँतिन रंग रंग बिहग आनँद सो रसैं ॥ २२॥ । कुठे जायफळे तर कुठे नागचाफे, बकुल, अशोक इत्यादि पुष्पवृक्ष आहेत; तर कुठे सुंदर व सुवासिक अगर, गुलाब, पाटल यांचे अणि मागच्याच्या फुलांचे ताटवे लागून राहिले आहेत; कुठे नेवारी, चंद्रवल्लि, शृंगारहार इत्यादि लता शोभत आहेत. अशा ह्या बागेतुन नानाप्रकारचे रंगी बेरंगी पक्षी आनंदाने (फळपुष्पांतून) रसपान करीत आहेत. (२२) | षट्पद लसत विहंगम बहु लवनित बहु भाँति बाग महँ। कोकिल कीर कपोत काल कलकल करंत तहँ ॥ मंजुल महरि मयुर चटुल चातक चकोर गन ।। पियत मधुर मकरंद करत झंकार भंग घन ॥