पान:संपूर्ण भूषण.djvu/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण

==

भूषन भनत जहँ परासि कै मनि पुहुपरागन की प्रभा । प्रभु पीत पट की प्रगट पावत सिंधु मेघन की सभा ॥ मुख नागरिन के राजहीं कहुँ फटिक महलन संग मैं । | बिकसंत कोमल कमल मानहु अमल गंग तरंग मैं ॥ १८ ॥ भूषण म्हणतो, समुद्रापासून जसा मेघसमुदाय प्रकट होतो; तद्वत्च न्या गगनरूपी तंबूत पुष्कराज भण्याची पीतवर्ण प्रभा उत्पन्न होऊन श्रीकृष्ण प्रभूच्या पीतांबरांप्रमाणे झळकत आहे. शुभ्र स्फटिकाच्या महालातून नगरवासी स्त्रियांची वदने, निर्मल गंगातरंगात नुकत्याच विकसलेल्या कोमल कमलाप्रमाणे विराजत आहेत. (१८) । आनंद स सुंदरिन के कहुँ बदन इंदु उदोत हैं। नभ-सरित के प्रफुलित कुमुद मुकुलित कमल कुल होत हैं। कहुँ बावरी सर कूप राजत बद्धमनि-सोपान हैं। जहँ हंस सारस चक्रबाक बिहार करत सनान हैं ॥ १९ ॥ (गडावर) कुठे कुठे दर स्त्रियांचे मुखचंद्र आनंदाने आकाश-गंगेतील प्रफुल्लित कुमुदिनी व अर्धस्फुटित कमले ह्यांच्या समुदायाप्रमाणे शोभत आहेत, तर कुठे रत्नखचित पाय-या असलेल्या विहिरी, सरोवरे व कूप विराजत आहेत; व तेथेच हंस, सारस, चक्रवाकादि पक्षी आनंदाने जलविहार करीत आहेत. (१९) । कितहुँ बिसाल प्रवाल जालन जटित अंगनि भूमि है। | जहँ ललित बागनि दुमलतानि मिलि रहै झिलमिल झूमि है ॥ चंपा चमेली चारु चंदन चारिहु दिसि देखिए। लवली लवंग यानि केरे लाखहीं लगि लेखिए ॥ २० ॥ तर कुठे विशाल अंगणांतून प्रवाळजडित वेलबुट्टा काढल्या आहेत. त्या अंगणात भोंवतालील सुंदर वृक्षलतच्या एकत्र आंदोलनाने अंधुकसा प्रकाश पडतो. (अर्थात् अंगणाँतील प्रवाळजडित वेलबुट्टया वृक्षलतच्या झुलण्याच्या वेलीं मधून मधून पडणान्या फटींतून लकाकत आहेत.