पान:संपूर्ण भूषण.djvu/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१।५।१९५-१५ जै जै निकुंभख़ुभद्दलनि भनि भूषन जै जै भननि । सरजा समत्थ सिवराज कहँ देहि बिजै जै जग-जननि २ हे आदि शाक्त ! हे कालिके ! हे कपर्दिनी (गौरी) ! हे मधुकैटभमहिषासुरमर्दिनी देवी ! हे चामुण्डदेवी ! हे भण्डारखंडिनी ! बिडालविध्वंसिनी ! शंभनिशुंभ-निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो. भूषण म्हणतो, हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा. (२) । शिवराय सूर्यवंशी असल्यामुळे कवीने प्रथम सूर्यदेवता व नंतर सूर्यवंशांत झालेले राजे यांचे वर्णन केले आहे. दोहा तरनि जगत जलानाधे तरनि जै जै आनंद ओक ।। कोक कोकनद सोकहर, लोक लोक आलोक ॥ ३ ॥ हे लोकलोकतरास प्रकाशित करणान्या सुर्यदेवते ! तू संसारसमुद्रतून पार पाडण्यास नौकारूप आहेस, तसेच चक्रवाक आणि कमले ह्यांचा तुं शोक हरण करणारी असून (सर्वांचे) आनंदभुवन आहेस. तुझा जयजयकार असो. (३) राजवंश-वर्णन, दोहा राजत है दिनराज को बंस अवनि अवतंस जामैं पुनि पुनि अवतरे कंसमथन-प्रभु-अंस ॥ ४ ॥ सूर्यवंशरूपी मुकुट ह्या भरतभूमीस शोभतो व ह्याच वंशांत कॅसमर्दन करणाच्या प्रभूचा अंश निरनिराळ्या रूपांनी पुन्हा पुन्हाँ अवतरित होतो.(४) महाबीर तो बस मैं भयो एक अवनीस ।। | लियो बिरद ५ सीसौदिया दियो ईस को सीस ॥५॥ सिसोदानिवासी ह्या अडनावाचे क्षत्रिय सर्व क्षत्रियति श्रेष्ठ आहेत, त्य।