पान:संपूर्ण भूषण.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण मंगलाचरण बिकट अपार भव पंथ के चले को स्रम हरन करन बिजना से ब्रह्म ध्याइए । यहि लोक परलोक सुफल करन कोकनद् से चरन हिए आनि कै जुड़ाइए ॥ अलिकुल कलित कपोल, ध्यान ललित, आनंदरूप सरित में भूषन अन्हाइए। पापतरुभंजन, बिघन गढ गंजन, जगत-मनरंजन द्विरद्मुख गाइए ॥ १ ॥ बिकट वाटेने चालणा-या वाटसराचे श्रम हरण करण्यास जसा पंखा, तद्वतच ह्या अपार संसाराच्या कठीण मागत होणा-या ताप (त्रया) पासून सुटका करून घेण्यास ब्रह्मा (गणराजा)चे ध्यान केले पाहिजे. इहलोक व परलोक सुफल करण्याकरिता त्या गणराजाचे ते लाल कमलाप्रमाणे असलेले चरण हृदयाशी घट्ट जुळून धरावे. भूषण म्हणतो, गणराजाचें तें भ्रमरसमुदायाने वेष्टित गंडस्थल व भुदर ध्यान पाहून आनंदरूपी नदीत निमज्जन फरावेसे वाटते. पापवृक्षाचे उन्मूलन करणा-या, विघ्नरूपी दगीचा विध्वंस करून जगताचे मनोरंजन करणा-या गजमुखाचे नित्य गान करावें. (१) छप्पय अथवा षट्पद जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनि । जै मधुकैटभ-छलनि देवि जै महिष-विमर्दिनि ॥ जै चमुंड जे चंडमुंड भंडासुर-खंडिनि। जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल-विहंडिनि ॥