पान:संपूर्ण भूषण.djvu/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६) व आनंदराव फौजेनसी जाऊन बहलोलखान धरिला. मोहकमसिंग व दारकोजी भोसले धरिले. हती ११ व घोडी १७ पाडाव केली. ( शि. प्र., पृष्ठ २५). रुस्तमजमा-ह्यास शिवाजीनें लुटले असें कवीने सांगितले आहे. पन्हाळ • गडप्रसंगी शिवाजीच्या ज्या हालचाली झाल्या त्यांत ह्याच्या ताब्यांतील सैन्याचा शिवाजीने पराभव केला अशी हकीकत आहे. । शाहिस्तेखान-- ह्याचा उल्लेख असलेले छंद सात आठ आहेत. त्यांत ह्याला दुर्योधन वगैरे म्हणून कद म्हणजे शिक्षा केली असे छंद ७७ मध्ये म्हटले आहे. विशेषतः ‘लाख सैन्य पदरी असणा-या ह्या खानाच्या महालांत शिवाजीने अवघ्या दोनशे लोकांनिशी जाऊन मोठमोठया मनसबदारांस व चौकीदारांस जखमी करून तथं 'महाभारत' म्ह. युद्ध केले' हैं जें छेद १८९ मध्ये कवीने सांगितले आहे ते सभासद बखर, व ले. ९३०-३५-३७ मधील मजकुशी सुसंगतच आहे. मात्र इंग्रज कंपनीवाल्यांच्या या पत्रांतून शिवाजीबरोबर चारशे लोक होते असे म्हटलेले आहे. सभासद बखरीत पृष्ठ ३३ वर भूषण कवीप्रमाणेच लोकसंख्या सांगितली आहे. शिवाजी-औरंगजेब भट-भूषणाने ह्या भेटचे वर्णन कोणत्याहि प्रसंगापक्षा अधिक केले आहे. निरनिराया एकंदर १४ छंदातून हे वर्णन आले आहे, यावरून कवीस ही भेट तशीच महत्त्वाची व आणीबाणीची वाटली असावा आणि ते खरेच आहे. पणवर्णित या भेटीचा थोडक्यात सारांश असा देता येईल. ही भेट, मुसलमानी धर्माप्रमाणे ‘जशन' ह्या धार्मिक उत्सवा या दिवशी, देवेन्द्राच्याहि वैभवाला लाजवील अशा उत्तम शृंगारलेल्या दरबारात झाली. शिवाजीचा दरबारात प्रवेश होताच भालदार-चोपदारांची तर गाळण उडालाच; पण कहीं उमरावहि शिवाजोस ताजीम देण्यासाठी उभे राहिले. हे पाहून औरंगजेब विस्मित झाला. शिवाजीस पंचहजारी सरदारांत उभे केले गेल्यामुळे वचनग (रसखोंट) झाल्याचे शिवाजीच्या ध्यानात आले व तो वा अपमानाने अतिशय क्रुद्ध झाला. हे पाहून जयसिंगपुत्र रामसिंग याने या वेळी न रागवावे अशी विनंति शिवाजीस केली; परंतु उपयोग झाला नाहीं. औरंगजेबाचे सारे लक्ष्य शिवाजीकडे होतेच, त्याने हा प्रकार पाहून गुसलखान्यांत शिवाजीची भेट घेण्याचे ठरवुन जसवंतसिंग व इतर स्वामिभक्तं सरदार बादशहाच्या दोन्ही बाजूस उभे असतां नि:शस्त्र शिवाजीची भेट तेथे घेतली. बादशहास त्याने