पान:संपूर्ण भूषण.djvu/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) तहाची हकीकत अली आहे. त्याशी हा उल्लेख जुळताच आहे. म्हणजे तहाचे वेळीं प्रथम ३५ किल्ल्यांची बोली होती. शेवटी १२ शिवाजीकडे राहून २३ मोगलांना दिले. (शके १५८७) जसवंतसिंग-शाहिस्तेखानानंतर दक्षिण सुभ्यावर त्याची नेमणूक झाली होती. याचा उल्लेख कवीने दुःशासन म्हणून एके ठिकाणी केला आहे. दाउदखान--सुरतेची लूट शिवाजीराजांनी दोन वेळां केली. शके १५८५५ व शके १५९२ मध्ये. ह्या दुस-या लुटीनंतर परत येत असतो ह्या दाऊदखानाश दिंडोरीपाशी शिवाजीचा झगडा होऊन खानाचा पराभव झाला. त्यास अनुलक्षन कवीने आपला अभिप्राय सांगितला आहे. दिलेरखान-साल्हेरी युद्धप्रसंग शके १५९२. याबद्दलचा उल्लेख ले. १३९६ चरून बरोबर दिसतो. नघसेरीखान-वर खानदौरासंबंधाने केलेले स्पष्टीकरण ह्या खानासहि लागू आहे. ( संग्रह ले, ७४३ व जे. शके १५७९ ज्येष्ठामधील उल्लेख पाहा.). | निजाम–निजामशाही कोकण शिवाजीने घेतले. त्यास अनुलक्षन छंद ७२ मध्ये निजामास जिंकणारा ( निजामके जितैया ) हे कवीने म्हटले असावें. | फत्तेखान-विजापुरदरबारी ज्याचे चांगले वजन आहे व ज्याचा आणि शहाजीची पक्ष एक आहे त्या फत्तेखानाशी शिवाजीचा तह झाला. (ले. ६६८) | बहलोलखान--ह्या नावाचे दोन सरदार असून एक मोगलांकडील क दुसरा अदिलशाही आहे. पैकी मोगली सरदार जो तो कवीला अभिप्रेत आहे*बहलोलखान शाह जानी' असा याचा उल्लेख येतो. त्याच्याशी युद्ध केले व त्यास पकडले ते साल्हेरीच्या शके १५९३ मधील लढाईचे प्रसंग. बहादुरखान-औरंगजेबाची प्रतिमाच दुसरी; अशा शाहिस्तेखानाबरोबर जी बड़ी थोरली फौज देऊन शिवाजीवर मोगलांची स्वारी झाली, त्या स्वारींत हा खान होता व तेव्हांचा उल्लेख कवीने बरोबर केला आहे. मोहकमसिग–याचाहि निर्देश साल्हेरीच्या युद्धप्रसंगानें कवीने केला आहे. स्थास धरले (छेद ३५६) व सोडून दिले (छंद२३९) असे जे लिहिले आहे, तेहि बरोबर आहे.यासंबंधाने जेधे शकावलीत असा उल्लेख आला आहे. साघमासी(शके १५९३) मोरोपंती हशम घेऊन सालेरीची माचीचा वेढा मारिला. उपराला केला. प्रतापराव