पान:संपूर्ण भूषण.djvu/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांनी इखलासखानावर मोठा जय मिळविला इत्यादि हकीकत इतिहासांत नमूद आहे. शके १५९४ ( शि. च. निबंधावली, पृष्ट ३४४ ). | उदयभानु-तानाजीने सिंहगड ज्या मोगल किल्लेदारापासून घेतला तोच हा उदयभान राठोड रजपूत (शके १५९१ ). ह्याविषयीची हकीकत प्रसिद्धच आहे. सिंहगड रात्री घेतला असें कवीनें छेद १००, २५९ मध्ये म्हटले आहे. | अदिलशहा----म्हणजे अली अदिलशहा. पन्हाळा शिवाजीने घेतला (शके १५८२ भाद्.) व परत देऊन सलाबतखानाशी जो सल्ला केला व ज्या सल्लल्यास पुढे अदिलशहाने हि मान्यता दिली तो उल्लेख येथे कवीने फारच चांगल्या प्रकारे वर्णिला आहे ( छंद १७८ ). (शके १५८२) कारतलबखान–स्याचा निर्देश कवीनें तलबखान असा केला आहे. या खानाशी शिवाजचे उंबरखिंडीत युद्ध झाले. त्या हकीकतीस अनुलक्षन हा खानाचा उल्लेख आला आहे तो बरोबर आहे. ( शके १५८२ ) जे. श. व शि. भा. किशोरसिंह-हा शाहिस्तेखानाबरोबरचा सरदार, कोटा संस्थानच्या हाडा नामक रजपत राजघराण्यापैकी आहे. याचा उल्लेख शि. भा. अ. २५, श्लोक ४२ मध्ये आला आहे. इतिहासात ह्याची मोगलांकडील कामगिरी प्रसिद्ध आहे. हा पुढे अर्कटच्या लढाईत मारला गेला. कुतुबशहा--अब ल कुतुबशहा. याच्याशी संबद्ध अशा विशोष हालचाली कवीनें वर्णिल्या नाहीत. खवासखान-- ह्याची कुडाळवरील स्वारी व तेथील त्याचा शिवाजीने केला पराभव कवीने सांगितला आहे. ह्या खेरीजहि खानाचे दोनतीन उल्लेख आहेत ते पन्हाळा इ० वेगवेगळ्या प्रसंगांचे असून बरोबर आहेत. यासंबंधीची पत्रेच सावंतवाडी-इ. सा., ले. ६ व संग्रह ले. १४४१ ३० प्रसिद्ध आहेत. खानदौरा-औरंगजेब दक्षिणेच्या सुभेदारविर दुस-यांदा असता त्याने बेदरकल्याणीकडे स्वारी केली. तेव्हां त्या खानास व त्याबरोबर तलबखान, जोरावर इ० सरदारांस जुन्नर ते नगरपर्यंतच्या प्रतिावर संरक्षणार्थ ठेविले होते. या भागावर शिवाजीनें स्वारी करून हती, घोडे, पैसा इत्यादि लूट मिळविली. त्यास अनुलक्षन ही निर्देश आहे छंद १०३. (शके १५७९) जयसिंग-याचा उल्लेख पुरंदरच्या तहाला अनुलक्षन आला आहे ३५ किल्ले शिवाजीने जयसिंगास दिले असे तेथे म्हटले आहे. संग्रह ले. १० ७७ मध्ये