पान:संपूर्ण भूषण.djvu/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐतिहासिक उल्लेख-परिचय ‘संपूर्ण-भूषण' हा ग्रंथ काव्यमय असून अलंकारशास्त्रविषयक व इति - हासकथन करणारा असा आहे. साहित्यशास्त्रांतर्गत उपमा इत्यादि १०५अलंकारांच्या व्याख्या ह्यांत सांगितल्या असल्यामुळे हा अलंकारविषयक झाला आहे: अाणि ह्या अलंकारव्याख्यांच्या स्पष्टतेकरितां कवीने आपल्याच कालच्या शिवः चरित्रांतील प्रसंगांची उदाहरण घेतली असल्यामुळे हा ग्रंथ इतिहासविषयकहि. झाला आहे. उदाहरणार्थ, रूपक या अलंकाराचे तिसरे उदाहरण पाहा. छेद ६३ यांत अफजल मरणाचा प्रसंग आला आहे. 'जावलीच्या जंगलांत अफजलखान रूपी हत्तीस शिवसिंहाने पंजाच्या जोराने मारिलें' ही प्रसिद्ध व ढोबळ गोष्ट तर कवीने तेथे सांगितली आहेच; पण विशेष हे की, अफजल मृत्यु पावल्यानंतर पळून गेलेल्या याकुतखानाचा निर्देश, हत्तीवांचून जसा माहूत तसा हा याकूत अंकुश घेऊन निजधामास ( विजापुरास ) पळून गेला, असा केला आहे. हे वर्णन कवीचे शिवसमकालीनत्व आणि सत्य व सूक्ष्म वृत्तावलोकन असल्याचे निदर्शक आहे. अफजलखान हा रागाद, दांडगा, प्रतिष्ठित, वजनदार व मानी होता; पण याकतखानाच्या सल्लयाप्रमाणे वागणारा होता; म्हणजे अफजलखान हा हत्ती व याकुतखान हा त्याचा माहूत होता हा त्या दोघां खानांचा संबंध कवीनें जो वर्णिला आहे तो लक्ष्यात घेण्यासारखा आहे. याकुतखानाचा उल्लेख ‘तथा सारथिना खानयाकुतेनाभिमानिना' (शि.भा.अ.४:१७) असा अन्यत्र आला असन खंड २०, ले. ७ व १७१ मध्ये ‘याकुतखान एदिलशाही' असे स्पष्ट म्हटलोहि आहे. ‘याकुतखान अकुश घेऊन पळाला' असे सांगण्यतिहिं कवीनें अंकुशखानासह याकूत. पळाला हे ध्वनित केले आहे. या अंकुशखानाचाहि उल्लेख इतिहासास प्रमाण आहे. रणदुल्लाखानाबरोबर हा अंकुशखान कर्नाटकांत होता, नंतर मुस्तफाखांकडेहि याची नेमणक झाली होती. ( शि. *1. व एक खाजगी देसायांचे दप्तर. ) हा अफजलमृत्युप्रसंग ज्या स्थली घडला ते स्थलहि: ‘पार जावलीके बीच गढ़ परताप तलै । (पृष्ठ १७३ ) असे नेमके व पुरते कवीने सांगितले आहे. अफजलखानाबरोबरच्या सैन्यसंख्येचाहिं निर्देश सभासद बखरीप्रमाणे 'बारा