पान:संपूर्ण भूषण.djvu/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलंकार-प्रस्तावना

=

=

==-=-=-=---=-

=-==-- -= -=- = -=-=-= शब्दांचा उपयोग करून न करितां (* प्रमाणे' हा उपमाबोधक शब्द घालूनच केले आहे. त्यामुळे ते उदाहरण उत्प्रेक्षेचे होऊ शकत नाही ही गोष्ट भाषांतर कारांचे नजरेतून सहज निसटून गेल्यासारखी झाली आहे. (उ) तुल्ययोगिता अलंकाराचे भाषांतरांतहि थोडी दुरुस्ती सुचवितो. येथील मूळ पण कवीचे लक्षणपद्य निःसादग्ध असे आहे. * अनेक वर्ण्य वस्तु किंवा अवयं वस्तु यांचें धमैक्य जेथें वर्णिले जाते तेथे तुल्ययोगिता” आणि “वयं आणि अवयं या दोघांच धर्मक्य जेथे वर्णिले जाते तेथे दीपक' असा या दोन अलंकारतील भेद कवीने मुळामध्ये स्पष्टपणे दाखविलेला असता ते भाषांतरांत तितका स्पष्ट झालेला नाहीं. तुल्ययोगिता, दीपक, प्रतिवस्तूपमा, दृष्टान्त वंगरेसारखे गम्योपम्यमूलक अलंकारांच्या उदाहरणांचे भाषांतर करतांना भाषांतरांतहि औपम्य गम्यच ठेवावयास पाहिजे. पण त्या बाबतीतहि काही ठिकाणीं नजरचुक झाली असल्याचे दिसून येते. | (ऊ) * एखाद्या वस्तूचा भाव जनमनरंजनासह जेथे प्रगट होतो तेथे सहोक्ति अलंकार होतो.' असे सहोदतीचे लक्षण भाषांतरांत दिले आहे. ते « जेथे वस्तूंचा सहव जनमुनोरंजक असेल तेथे सहोक्ति अलंकार होतो' असे केल्यास निदोष होईल, | पर्यायोक्त, असंगति, व्याघात, एकावली इत्यादि अलंकारांच्या लक्षणांचे भाषांतरांतहि वर दाखविल्याप्रमाणेच थोडथोडा प्रकार झाला आहे. तथापि एकंदरीत विचार करता *षण कवीच्या प्रस्तुत काव्याचा मराठी वाचकांना सामान्य परिचय करून देण्याचे काम या भाषांतराचा पुष्कळच उपयोग होईल अशी आमची समजूत आहे. असो. | ७, * श्रीशिवराज-भूषण” या भूषण कवीच्या काव्यग्रंथाचे समग्र परीक्षण करण्याचा आमचा येथे विचार नाहीं. आज प्रसिद्ध होत असलेल्या मराठी षितिररूप प्रस्तुत पुस्तकाचे अलंकारशास्त्रदृष्टया सामान्यस्वरूप वाचकाचे पुढे ठेवणे इतकाच या प्रास्तविक लेखाचा उद्देश असल्याने तो तांपर्यंत केलेल्या विस्ताराने स्वल्पशाने का होईना सिद्धीस गेला असल्यास पुरे आहे. बा. मा. खुपेरकर शास्त्री.