पान:संपूर्ण भूषण.djvu/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलंकार-प्रस्तावना


कडे फाटेतोलपणाने पाहणे, विशेषत्वाने पाहणे प्राप्त असल्यामुळे त पहात असतां कहीं स्थली भाषांतर यथार्थ घडून आल्याचे दिसून येत नाही. उदाहरणार्थ (अ) आरंभीचा उपमा अलंकार. तेथे 4 जण काय सैन्याच्या अग्रभाग रागावलेल्या हत्तीस माहूत चुचकारून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत'; असे उदाहरणपद्याचे भाषांतर केले आहे; परंतु « जणों काय' ही पदे उपमालंकारसूचक नसून उत्प्रेक्षासूचक आहेत. | (अ) * जेथे प्रसिद्ध उपमानाचे उपमेयत्व वर्णन केले जाते तेथे प्रतीप अलंकार होतो' असे प्रथम प्रतीपाचे लक्षण आहे. या अलंकाराच्या उदाहरणाचे (५ ज्याप्रमाणे चंद्रानें अधकारास प्रासुन शुभ्र चांदणे पसरावे; त्याप्रमाणे शिवाजीनें अफजलखानास मारून पृथ्वीवर आपली उज्ज्वल कीर्ति पसरली" असे भाषांतर केलेले आहे. परंतु, या उदाहरणांत वयं शिवाजी असल्याने तो उपमेय आहे आणि त्यास चंद्राची उपमा दिलेली असल्याने तो चंद्र उपमान आहे. या चन्द्र उपमानाचे उपमेयत्ववर्णन हैं येथे उदाहरणांत अभि प्रेत आहे. म्हणजे त्याकरिता « ज्याप्रमाणे व त्याप्रमाणे या उपमाबाधक शब्दांची उलटापालट केल्यास वरील वाक्यच लक्षणानुसार प्रस्तुत अलंकाराचे उदाहरण सुसंगत होईल. येथील ही सुधारणा अत्यंत थोडी आहे. परंतु ती अवश्य असल्यामुळे दर्शित केली आहे. (इ) / उपमेयोपमा अलंकाराचे उदाहरणांतच * तुझा हात कल्पवृक्षाप्रमाणे शोभतो; किंबहुना कल्पवृक्षच तुझ्या हातामुळे शोभतो असे म्हटले आहे. त्या ऐवजी १५ तुझा हात कल्पवृक्षाप्रमाण जसा शोभतो तसा कल्पवृक्षहि तुझ्या हाताप्रमाणे शोभतो.' असे असल्यास ते अधिक समर्पक होईल असे वाटते. (ई) ८ आन बातको आन मै जहँ संभावत होय, वस्तु हेतु फल चुत कहत उत्प्रेक्षा है सोय ॥' या उत्प्रेक्षालक्षणाचे भाषांतर (* एका वस्तूत अन्य वस्तूची संभावना करून वस्तूचा हेतु फलासुद्धा सांगितला जातो तेथे अक्षा अलंकार जाणावा' असे केले आहे. परंतु जेथे एकावर दुस-याची कल्पना केलेली असून ती कल्पना वस्तु, हेतु आणि फल यांच्या आश्रयाने असते तेथे उभेक्षा अलंकार जाणावा असे भाषांतर पाहिजे. वस्तु, हेतु अाणि फल यांच्या आश्रयानें वस्तूत्प्रेक्षादि उत्प्रेक्षेचे तीन भेद येथे होत आहेत. काही कांहीं उदाहरणचि भाषांतरहि 4 जणं काय " वगैरेसारख्या उत्प्रेक्षाबोधक