पान:संपूर्ण भूषण.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलकार-प्रस्तावना त्यांची स्वतंत्र अलंकार म्हणून गणना केली नाही असे जे परिणाम, परिकरकुिर वगैरेसारखे चन्द्रालोकांतील अलंकार त्यांची लक्षणे व उदाहरणे देऊन त्यांचा संग्रह प्रस्तुत ग्रंथांत केला आहे. वे तसेच उपमा, अतिशयोक्ति आणि अपन्हुति या अलंकारांचे जे निरनिराळे पोटभेद चन्द्रालोककाराने केले आहेत व जे काव्यप्रकाशादि नव्या मताचे ग्रंथांत दिसून येत नाहीत त्यांचाहि संग्रह षण कवीने आपल्या या ग्रंथांत केला असल्याचे दिसून येते. आतां चन्द्रालोकांतील विधिप्रतिषेधादि* पंधरा अलंकारांचा प्रस्तुत ग्रंथांत जरी कोटेंहि पत्ता लागत नाही; तथापि षणकवीने चन्द्रालोकांतील शतअलंकारांप्रमाणे आपल्याहि ग्रंथांतील अलंकारांची शतसंख्या भरण्यास उपमेचे दोन भेद, अपन्हुतीचे पांच भेद, अतिशयोक्तीचे चार भेद, भाविकाचा एक भेद व सामान्यविशेष आणि प्रश्नोतर असे दोन नवीनच अलंकार कल्पून ही शतसंख्या पुरी केली आहे. या पंधरा अलं. काराचे बाबतींत वर दाखविल्याप्रमाणे शिवराजभूषण व जयदेवाचा चन्द्रालोक यांमध्ये जरी फरक दिसून येतो, तरी इतर सर्व अलंकारांची व लक्षणांची रचना व क्रम व तसेच उत्प्रेक्षा रुपकांचे पोटभेद या बाबतीत या दोनहि ग्रंथांचे सर्वांश साम्य असल्याने शिवराज-भूषण हा ग्रंथ लिहिताना भूषण कवीच्या पुढे जयदेवाचा चन्द्रालोक हा ग्रंथच मुख्यतः असावा असा आमचा तर्क आहे. ५. श्रीशिवराजभूषण या ग्रंथांत कवीने आम्ही वरील कलमत दाखविल्याप्रमाणे जरी बहुतेक चंद्रालोकांतील अलंकारांचा संग्रह केलेला आहे; तथापि ललितपमा' व 'सामान्य विशेष' हे दोन अलंकार चद्रालोकति किंवा इतर कोणत्याहि प्राचीन अलंकारशास्त्रग्रंथांत उपलब्ध न होणारे असे स्वतंत्रच येथे लक्षणोदाहरणासह कवीने दिले आहेत. तसेच जुन्या कारणमाला नामक अलंकारास * गुंफ' अशी नवीनच पण यथार्थ संज्ञा निर्माण केली आहे. चित्रालंकारांतील कामधेनु चित्रहि नवीनच आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असतो कवीचा । * १ विधि. २ प्रतिषेध. ३ युक्ति. ४ विवृताक्ति. ५ गुढोक्ति.६ सूक्ष्म, ७ उत्तर. ८ अनुगुण. ९ रत्नावाल. १० मुद्रा. ११ लालत. १२ विकस्वर. १३ कारकदीपक. १४ अल्प, १५ प्रस्तुतांकुर. | १ उपमा---१ मालापमा, २ लालतापमा असे दोन भेद. २ अपन्हुति-- १ हेतु. २ पर्यस्त, ३ भ्रांत, ४ छेक, ५ कैतव, असे पांच भेद. ३ अतिशयोक्ति१ भेदक, २ अक्रम. ३ चंचल, ४ अत्यंत असे चार भेद. १ भाविक, २ विरोध. ३ सामान्य विशेष ४ प्रश्नोत्तर. मिळन एकूण १५ अलंकार.