पान:संपूर्ण भूषण.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर-प्रस्तावना --


--



राजधानाच्या ऐश्वर्याचे वर्णन उदात्तालंकारमिश्रित अतएव फारच बहाराचे असे असून कविप्रतिभा येथे अधिकच विकसित झाल्याचे दिसून येते. हा उपोघातांतील भाग प्रत्यक्ष मूळांतूनच वाचकांनी वाचून पहावा म्हणजे आम्ही म्हणतो त्याचा त्यांस खास प्रत्यय होईल. ४. उपोद्घाताविषयी सामान्यतः इतके विवेचन केल्यानंतर आता मुख्य ग्रंथ जो • शिवराजभूषण त्यासंबंधी विचार करावयाचा. प्रस्तुत * शिवराजभूषण' हा एक शिवचरित्रपर असा अलंकारशास्त्रीवरील ग्रंथ आहे. संस्कृत वाङमयति अलंकारशास्त्रावर पुष्कळच ग्रंथसंपात्त आहे. परंतु त्यांतील बहुतक ग्रंथकार, फार काय पण स्वतःला सरस्वतीदत्तवरप्रसाद म्हणवून घेणारे मम्मटाचार्यांसारखे ग्रंथकारहि अलंकारांची लक्षणे (व्याख्या)स्वत: करतात आणि त्या त्या अलंकारांच्या लक्षणानुसार उदाहरणे मात्र कालिदासादि । प्राचीन अभियुक्त कवींच्याच काव्यातील निवडून देतात असे दिसून येते. परंतु जगन्नाथराय पंडितासारखे दिव्य प्रतिचे महाकाव, जसे संस्कृत वाङ्मयांत ** अलंकाराच्या लक्षणांस उदाहरणभूत असे नवीनच काव्य निर्माण करून मी येथे रसिकांपुढे ठेवीत आहे परक्यांच उसनवार असें मीं कांहींच घेतलेले नाही कस्तूरी निर्माण करण्याची शाक्त ज्यास आहे असा कस्तुरीमा हा इतर फुलांची वास घेण्याचे कधी तरी मनात आणाल काय ? " अशी दर्पोक्ति मोठ्या अदियतेनं पा यथार्थतेने व्यक्त करणारे स्वल्प प्रमाणांतच उत्पन्न होतात. पंडितरायांच्या रसगंगाधरासारखाच लक्ष्यलक्षणात्मक उभ्यरूप ग्रंथ देशी भाषेत निर्माण करण्याचा भूषण कवीचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये *षणकवीने अर्थालंकार १०० व शब्दालंकार ५ मिळून १०५ अलंकारांची लक्षणे व उदाहरणे दिली आहेत.* हीं जी १०० अर्थालंकारांची लक्षण येथे *षणकवीने सांगितली आहेत ती बहुतेक जयदेव कवीच्या चन्द्रालोकनामक, अलंकारशास्त्रग्रंथावरूनच घेतलेली असावीत असे दिसून येते. कारण, काव्यप्रकाशकार मम्मट आदिकरून नव्य आलंकारिकनिी ज्या अलंकाराचा इतर अलंकारांतच अन्तत होत असल्याने ६ निर्माय नूतनमुदाहरणानुरूपं काव्यं मयात्र निहितं न परस्य किंावत। किं सेव्यते सुमनसा मनसापि गन्धः कस्तूरिकाजननशक्तिभता मृगेण ।। –रसगंगाधर. * एक सत भुषन कहे अरु पांच--- .