पान:संपूर्ण भूषण.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फर-भर।।१।। यांतील पहिल्या पद्यति विघ्ननिवारणार्थ विघ्नहर्या गजाननाचेच भजन व ध्यान हैं। सवानीं अवश्य केले पाहिजे असे सुचवुन द्वितीय पद्यत शुभनिशुभ आदिकरून दैत्यांचे निर्दालन करणारी जी आदिशक्ति कालिकादेवी तिचा प्रथम जयजयकार केला आहे व पुढे काव्यनायक जे शिवाजीमहाराज यांना विजयप्राति देण्याविषयी तिला प्रार्थना केली आहे. मंगलाचरणाचे तृतीयपद्यति जगत्प्रकाशक व प्रस्तुत काव्यातील वय॑नायक जे शिवराय त्यांच्या कुलांतील उदिपुरुषाचे-सूर्यनारायणाचे वर्णन करून कवीने येथे एक प्रकारचे आचित्यहि साधले अाहे. मंगलाचरणाची हीं तनाह पथे उपमारूप कादि अर्थालंकार व अनुप्रासादि शब्दालंकार यांनी षित झालेली असल्याने ती प्रस्तुत काव्यकर्त्या कवीच्या उज्वल प्रतिची व प्रसंगोचित वर्णनशलाची साक्ष चांगलीच पटवृन देतात. चतुर्थपद्या. पासून पद्य आठपर्यंत राजवंशवर्णनाला आरंभ करून त्यांतील शिसोदिया नामक वंशांत मालोजी नामक राजा निर्माण झाल्याचे सांगितले आहे. या मालोजी राजानेच रणर मंवर सिंहाप्रमाणे शौर्य गाजवन सरजा है। पदवी, दीघटग्य प्राप्त करून घेऊन खुमान ही पदवी व शिलेप्रमाणे धर्याने व निश्चलपणे टिकाव धरून भू+सिला=सिला ही पदवी प्राप्त करून घेतली. या पदव्यांतील भोसला या पदवीच्या व्युत्पतीविषयीं के ० राजवाडे यांनी रा. मा. विलासचंपूच्या प्रस्तावनेमध्ये केलेल्या विस्तारापेक्षां प्रस्तुत कवीने दिलेली भोसले आडनांवाची व्युत्पतिच अम्हांस पुष्कळ समर्पक वाटते. नऊ आणि दही या पयति मालोजीपुत्र शहाजीचे वर्णन असून व पुढे अकराव्या व बाराव्या पद्यति दशरथपुत्र राम हाच वसुदेवपुत्र कृष्ण झाला व तोच पुढे शहाजीचे पोटी श्रीशिवराज नाम धारण करून अवतीर्ण झाला. *त्या वेळी कलियुग नाहीसं झालं, म्लेंच्छांचा अहंकार नष्ट झाला व देवब्राह्मण संतुष्ट झाले, असे सांगितले आहे. तेरावें पद्य शिवाजीच्या बालक्रीडा वर्णनार्थ खर्ची घालुन चवदाव्या पद्यापासून शिवाजीन दक्षिणेतील सर्व किल्ले जिंकून गढपति अशा ज्या रायगड किल्ल्यावरच आपले निवासस्थान केले त्या रायगडाचे वर्णनास सुरवात केली आहे. चोवीस पद्यांपर्यंत केलेलें हैं रायगड || इतिहासदृष्ट्या व्युत्पत्तिशास्त्राचा विचार करणा-या चिकित्सकांनी या भूषण हवीने दिलेल्या १५ भोसले' शब्दाच्या व्युत्पतीकडे अवश्य लक्ष्य दावे अशी आमची येथे सूचना आहे.

  • शिवभारतांतहि शिवाजीमहाराज हे विष्णूचे अवतार हेत असे वर्णन आहे.