पान:संपूर्ण भूषण.djvu/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलंकार-प्रस्तावना -" -"--"-"", "*"*"-*-*-*-* -*-*-*-**-*-*--*-

  • --*-*-*-*

-*-*-*-*-*-*-*-*- योगाने वाचकांची चित्तवात वेधून घेऊन त्यस सन्मार्गाचरणाचे कटु धडे स्वीकारण्यास प्रवत्त करितात व त्यायोगे त्यांचे हित साधुन देतात. हाच काव्यवाड्मयाचा विशेष गुण ध्यानी घेऊन कालिदासादि महाकवींनी जशी संस्कृत भाषेमध्यें काव्यरचना केली तशीच इतर भाषांमध्येहि ती पुष्कळ आहे. आज महाराष्ट्रभाषेमध्ये भाषांतरित होऊन मुळासह प्रसिद्ध होत असलेले भूषण कवीचे • श्रीशिवराजभूषण' हे व्रज भाषेतील काव्यहि याच प्रकारचे आहे. २. प्रस्तुत काव्याचा कर्ता महाकवि भूषण हा काश्यप गोत्री कनोजी ब्राह्मण असून यमुनानदीच्या तीरावरील त्रिविक्रमपूर नामक गांवीं रहात असलेल्या रत्नाकराचा मुलगा होय. यास लंकी वंशांतील रुद्राचा मुलगा हृदयराम याने 44 कविभूषण' ही पदवी दिली होती. पूर्वी या त्रिविक्रमपुरामध्येच बीरबलासारखे वीर पुरुष व अनेक कवि उत्पन्न झालेले असून तेथेच काशीविश्वेश्वरासारखी बिहारीश्वर नामक एक देवताहि असे. उत्तरेकडे राहणारा असा हा कवि दक्षिणेत शिवाजीमहाराजांनी सर्व यवनांना जिंकून रायगड ही आपली राजधानी केली व तेथे महाराज हे सर्व लोकांना रुचिदान देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करीत आहेत अशी महाराजांची कीर्ति ऐकून, इतर गुणिजनांबरोबर महाराजांचे दर्शना साठी दक्षिणेत अाला. इकडे रायगडावर आल्यानंतर महाराजांचे उज्ज्वल चरित्र त्याचे दृष्टीस पडले व त्याने कलियुगातील कवींनी हिं धर्माचा उच्छेद करणा-या म्लेच्छ राजांची कवने रचन भ्रष्ट केलेल्या वाणीला पवित्र करप्याच्या हेतूने गो ब्राह्मणप्रतिपालक शिवरायाचेच चरित्र नानाप्रकारच्या शब्दार्थालंकारांनी सजवावे अशी बुद्धि धरली व तदनुसार प्राचीन महाकवींचा काव्यरचनामार्ग त्यांच्या कृपेने समजावून घेऊन अलंकारमय शिवभूषण नामक शुभ ग्रंथ निर्माण केला. ३. प्रस्तुत शिवराजषण हे काव्य काव्यसमातीच्या वेळी कवीने रसिकांना जी वनंात केली आहे* ती वरून वि. सं. १७३० म्हणजे शके १५९६ या साली रचि ल्याचे स्पष्ट होत आहे. प्रस्तुत काव्यांत एकंदर ३८२पर्थे असून अरची तीन पर्यों भारतवर्षीय कविसांप्रदायानुसार इष्टदेवतानमनरूप मंगलाचरणात्मक अशी आहेत.

  • सम सत्रहलै तीस पर सुचि वदि तेरास भनि । *षण सिवःषन कियो पढियो सकल सुजान ॥१॥ संवत् १७३०, ज्येष्ठ व. १३ रविवारी भूषणानें * शिवराजभषण काव्य रचिले. सर्व सुजाण लोक हो, वाचा.