पान:संपूर्ण भूषण.djvu/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न. १०२३१ ७६५ श्रीशिवराज-भूषण । अलंकार-प्रस्तावना प्रबन्धानां प्रबन्धृणामपि कीर्तिप्रतिष्ठयोः । मुलं विषयभूतस्य नेतुर्गुणनिरूपणम् ॥ --प्रतापरुद्र. उदारचरितनिबन्धना प्रबन्धप्रतिष्ठा । ---रुद्रभई स्थ व ग्रंथकार यांची कीर्ति चिरकाल स्थिर होण्यास जर मुख्य मूलभूत अशी एखादी कोणती गोष्ट असेल, तर त्या ग्रंथकाराने आपल्या ग्रंथांत केलेले उदारचरित नायकाचे उदात्त गुणवर्णन इंच होय. भगवान् श्रीरामचंद्राचे वर्णन केल्यामुळेच वाल्मीकीला महर्ष ही पदवी प्राप्त झाली व त्यांच्या रामायण नामक प्रथास 44 आदिकाव्य" असेहि लोक म्हणू लागले. वेद, इतिहास व पुराणे यांच्या अध्ययनाने सर्वांचे जे कल्याण होत आहे, त्यास मुख्यतः कारण त्या त्या ग्रंथा. तून ग्रंथकारांनी केलेले भगवद्वर्णन हेच होय. परमेश्वराच्या वर्णनामुळे वेदादि प्राचीन ग्रंथ हे जरी लोकहितकारक म्हणन प्रसिद्ध आहेत, तथापि, त्यांचेपेक्षांहि सत्काव्यग्रंथांची उपयुक्तता कांहीं विशिष्टदृष्टीने अधिक आहे. मानवजन्माचे सार्थक्य ज्या पुरुषार्थप्राप्तीमध्ये होत असते, त्या धर्मार्थकाममोक्षप पुरुषार्थचा लाभ वैदिक वाङमयाच्या अध्ययनाने अवश्य होईल. पण हे जरी खरे असले तथापि वेद हे विधिनिषेधात्मक अतएव केवळ शब्दप्रधान असे असल्याने त्यांच्या अध्ययनार्थ व तपदिष्ट धर्माचरणार्थ परिणतबुद्धीच्या विद्वानासहि अत्यंत फ्रेश होतात. यामुळे या वेदवाङमयाच्या अभ्यासाकडे सामान्य जनांचा प्रवात क्वचितच होत असलेली दृष्टीस पडते. आता वेदानंतरचे स्मति, इतिहास किंवा पुराणे हे ग्रंथ वेदासारखे शब्दप्रधान नाहीत. तथापि ते इष्ट व अनिष्ट अशा विषयांचे केवळ तटस्थपणे प्रतिपादन करीत असल्याने काव्यग्रंथांइतके वाचकांचे चित्तास सहज आकर्षक होऊ शकत नाहीत. काव्यवाङ्मयाची गोष्ट मात्र या शब्दप्रधान व अर्थप्रधान अशा श्रुतिस्मृत्यादि वाङ्मयाहून अत्यंत भिन्न अशा आहे. काव्यग्रंथ हे मर अनुपानमिश्रित अशा औषधाप्रमाणे सरस व सालंकार वर्णनाच्या