पान:संपूर्ण भूषण.djvu/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* ? आभारी आहे. तसेच काव्येतिहास-संग्रहतील व नवलकिशोर प्रेसचे शिवराज भूषणाचा व चरित्र लेखनास लक्ष्मी-व्यंकटेश्वर प्रतीचे व श्री तिवारी यांच्या शिवाजी-प्रतापाचे साहाय्य झालें. एतदर्थ स्यांचे हि आभार मानणे क्रमप्राप्त आहे.* श्री० बा. मा. खुपेरकर शास्त्री यांनी, अलंकार-प्रस्तावना लिहून देण्याच्या विनंतीला मान देऊन आपल्या खासगी अडचणी बाजूस ठेवून वेळेवर प्रस्तावना लिहून पाठविली याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. इतिहास-मंडळाने आपल्या पुरस्कृत ग्रंथमालेत ह्या ग्रंथाचा समावेश करून व ऐतिहासिक माहिती देऊन भाषतरफयस कायमचे ऋण केले आहे. श्री० शंकरराव जोशी ह्यांनी हिन्दीसारख्या परभाषेतील काव्याची सुद्रिते व्यवस्थितपणे तपासून दिल्याबद्दल तसेच ग्रंथसंपादनासंबंध वेळोवेळी उपयुक्त सुचना दिल्याबद्दल आणि काव्यातील ऐतिहासिक उल्लेखांचा परिचय' लिहून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानल्यावाचून राहावत नाही. शेवटीं, हिन्दी भाषेचे फाव्य मराठी टाइपति ( पण हिन्दीप्रमाणे ) शुद्ध, सुबक, सफाईदार व नियमित अवधीत छपून दिल्याबद्दल 'विजय' छापखान्याचे मालक श्री० अप्पासाहेब गोखले ह्यांचे आभार मानून ही प्रस्तावना संपवित. रामचंद्र गोविंद काटे

  • के०राजवाडे राधामाधव वि. चंपू प्रस्तावना पृष्ठ ६ जयराम कवीसंबंधी उल्लेख,