पान:संपूर्ण भूषण.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन १६ भूषण थकले व पुन्हा म्हणाले नाहींत. तेव्हा शिवाजीमहाराजांनी छापली ओळख दिली व म्हणाले जिनके वेळी तुम्हीं छंद म्हणालो असत तितके लक्ष रुपये, तितके हत्ती व तिने काँच गावें तुम्हांस मिळाली असती. भुषणांनी तेवढ्यावरच समाधान मानले व तेव्हापासून ते शिवरायाचे दरबारी फाव वनले. (४) भूषण दक्षिणेतून सन्मान व धन कमाउन बन्पूच्या भेटीसाठी दिल्लीस गेले. दिळीस हे आल्याची वार्ता बादशहास समजली. भूषणास दरबारात घेऊन येण्याकरित चिंतामणीस बादशहाने सांगितले.भूषणांनी प्रथम बन्धूचे म्हणणे मान्य केले नाही. चिंतामणीच्या समजावण्यावरून एका अटीवर दिल्लीपतीची भेट घेण्यास ते तयार झाले. ती अट म्हणजे शिवराजाचचून इतरांची स्तुति न करण्याची ही अट मान्य करण्यात आल्यावर मूषण दरबारति गेले. बादशहाने भूषणाची वीररसयर कविता ऐकण्याची इच्छा दर्शविली. भूषण म्हणाले, माझी वीररसाची कविता ऐकत असत आपला अपवित्र ठिकाणचा हात मिशीवर जाईल. त्याकरिता हात धुऊन तुम्ही माझी कविता ऐका. भूषणांनी आपली वीररसाची कविता ऐकविली व बादशहाचा हात खरोखरच मिशीकडे वळला. या वेळीच इतर राजे मांडलिक व दिल्लीश्वर सार्वभौम तो सर्वांकडून फरभार घेतो; पण शिवाजीकडून घेण्याची प्राज्ञा नाही हे भ्रमर चंपक कल्पनेचे दोन छंद म्हणून स्यांनी दाखविले * (3) पुढे कमाऊनच्या राजाचे भेटीस भूषण गेले. भूषणास शिवराजदरबारी मिळालेल्या सन्मानाविषयी व धनाविषयी त्या राजास किंचिद शंका वाटली. व ने भूषणांची परीक्षा पाहिली. भूषणास तो एक लाख रुपये देऊ छागला भूणिनी त्याचे धोरण ओळखून चटदिशीं सागितले की, “मी तुमच्या येथे पैशाच्या लालचनें आलो नाही. शिवरायाच्या कीर्तीचा प्रसार येथवर

  • ही औरंगजेब भूषणाची भेट मिश्रबन्धूना अग्राह्य वाटते.