पान:संपूर्ण भूषण.djvu/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६५ शिवा-बावना به نسبت به نستلبسين بتيجيخي ته هياج

-=-=--=-=-=-=-

शिवाजीने आपल्या तरवारीच्या जोरावर वेद आाण पुराणे यांचे संरक्षण केले, सर्वस्वाचे सार असे जे रामनाम तें हिन्दूच्या जिव्हेवर कायम ठेविल. हिन्दूची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी (उपजीविका) चालविली. खांद्यावरील जानवी आणि गळ्यातील माळा सुरक्षित ठेविल्या. मोगलांचे यथास्थित मर्दन केले, बादशहास मुरगाळून टाकिलें, शत्रू चुर्ण केले. इतके करून आपल्या हातीं वर देण्याचा अधिकार ठेवला देवळात देव व घरात कुलधर्म, कुलाचार कायम ठेविले. (५१) " सपत नगैस चारो कुकुभ गजेस कोल कच्छप दिनेस धरै धनि अखंड को । पापी घाले धरम सुपथ चाले मार तंड, करतार प्रन पाले प्रानिन के चंडको ।। भूषन भनत सदा सरजा सिवाजी गाजी म्लेच्छन को मारै करि कीरति घमंड को ॥ ज-काज-वारे निहचिंत करि डार सब भोर देत आसिष तिहारे भुजदंड को ।। ५२ ॥ भूषण म्हणतो, हे धर्मवीर शिवाजी ! तुम्हीं म्लेंच्छना मारून अखंछ कीर्ति आणि मान मिळविला. दष्टांचे निधन ६.रून स६ धमार्गाने चालविला; व परमेश्वराची प्रतिज्ञा ( यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति • भारत । अभ्युथानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। ) अक्षरशः पाळली, जीवांच्या सामर्थ्याचे संरक्षण केलें; यामुळे सातहि पर्वत, चारी दिशा, वराह, कूर्म, पृथ्वीस अस्ड धारण करणारा शेष, सूर्य, तसेच नित्याचा व्यवहार सुरळीतपणे चालू लागल्यामुळे प्रापंचिक लोक, रोज सकाळी उहून अगोदर तुमच्या उभय बाहूंस आशीर्वाद देत आहेत. (५२) (80 5 65 शिवा बावनी समाप्त - - ---