पान:संपूर्ण भूषण.djvu/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी १६४


-- , शिवाजीने आपल्या तरवारीच्या जोरावर दिल्लीच्या सैन्यास जरबेंत ठेऊन-पराभव करून-दुनियेत मर्यादा (शांतता) राखली; तसेच देशामागे देश जिंकल्याने मराठीची चहूंकडे ख्याति झाली तेव्हाँ ( ती ) म ऐकली. (४९) | सारस से सूबा करवानक से साहजादे, मोर से मुगल मीर धीर ही धनैं नहीं। बगुला से बंगस बलूचियो बतक ऐसे, काबुली कुलंग याते रन में रचें नहीं ॥ भूषन जू खेलत सितारे में सिकार सिवा साहि को सुवने जाते दुवन सँधै नहीं । बाजी सब बाज से चपेटै चंगु चहूं ओर, तीतर तुरुक दिल्ली भीतर बचें नहीं ॥ ५० ॥ [ या दांत कवीने शिवराज शिकारी व इतर राजे बादशाह ही त्याची सावजें होत, असे एक मौजेचें रूपक कल्पिलें आहे ] ( ठिकठिकाणचे ) सुभेदार हे सारस, शहाजादे हे गौरवपक्षी व मोगल सरदार हे मोरप्रिमाणे होत. हे सारे शिकारी शिवाजीस पाहून, मुळीच धैर्य धरीत नाहीत. बंगष बगळ्याप्रमाणे व काबुली कुलंगाप्रमाणे असून ते शिवाजीरूपी शिका-यास पाहून मैदानत (रणत पाय :उद्धा ठेवीत नाहींत. नूषण म्हणतो, शहाजीचे सुपुत्र शिवाजी हे साता-यात शिकार खेळतात, पण या पक्षीरूप दुर्जनची इतस्ततः फिरण्याची प्रज्ञा नाहीं; कारण तो शिवाजी बहिरी ससाण्याप्रमाणे कोणीकडून भरारी मारून पंजीत कसा पकडील याचा नेम नाहीं व म्हणूनच दिल्लीत यवनरूप तित्तिर पक्षी वाचणे कठिण झाले आहे. (५०) 1/ वेद राखे विदित पुरान राखे सार युत रामनाम राख्यो अति रसना सुघर में । हिन्दुनकी चोटी रोटीराखी है सिपाहिन की, काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में ।। मीडि राखे मुगल मरोरि राखे पातसाह, बैरी पसि राखे बरदान राख्यो करमें । राजन की हद्द राखी तेग बल सिधराज, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमें ।। '५१ ॥