पान:संपूर्ण भूषण.djvu/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ j५} । । । । ।।। बादशहाच काय तो मोठा असे लोक समजत असत; पण शिवाजीच्या प्रकट होण्याने राजाच मोठा ( श्रेष्ठ ) असतो हे समजून आलें. (४३) दुग्ग पर दुग्ग जीते सरजा सिवाजी गाजी, उग्ग पर उग्ग नाचे रुंड मुंड फरक। भूषन भनत बाजे जीत के नगारे भारे सारे करनाटी भूप सिंहल को मरकं । मारे सुनि सुभद पनारे बारे उदभट, तारे लगे फिरन सितारे गढ़धर के। बीजापुर बीरनके गोलकुंडा धीरन के दिल्ली उर मीरन के दाडिम से दर के ॥ ४४ ॥ धर्मवीर शिवाजीने एकामागून एक असे कित्येक किल्ले घेतले. रणांगणति शेंकडों धडे व शिरे नाचू उडू लागली. विजयदुंदुभींच्या प्रचंड जयघोषाने कर्नाटकचे सर्व राजे थेट सिंहलद्वीपपर्यंत पळाले. शिवाजीच भाग्यसूर्य अनुकूल तळपत आहेसे पाहून व पन्हाळगडच्या शूर वीर योद्धस मारलेले ऐकून विजापूरच्या वीरांची, गोवळकोंडा येथील धैर्यशील शुरची, व दिल्लीच्या सरदारांची हृदयें डाळिंबाप्रमाणे उकलली ( फाटलीं). (४४) मालवा उजैन भनि भूषन भेलास ऐन सहर सिरोज लौं परावने परत हैं। गड़बाना तिलंगानो फिरंगानो करनाट रुहिलानो हिलन हिये हहरत हैं । साहिके सपूत सिवराज, तेरी धाक सुन गढ़पति बीर तेऊ धीर न धरत हैं । बीजापुर गोलकुंडा आगरा दिल्ली के कोट बाजे बाजे रोज दरवाजे उघरत है ॥ ४५ ॥ भूषण म्हणतो-हे शहाजीचे सुपुत्र शिवराज! तुमच्या धाकाने माळव, उज्जैन, आणि भेलसा येथील (यवन) रहिवाशांस थेट इराणची राजधानी शिराजपर्यंत पळावे लागले. गोंडवण, तेलंगण, रोहिलखंड, कर्नाटक तसेच फिरंगी लोकांच्या वस्तीतील रहिवाशांच्या हृदयात धडकी भरली आहे मोठमोठे शूर किटेदार धीर धरीनातसे झाले. गोवळकोंडा, आग्रा आणि | शि. ५ : ११ |