पान:संपूर्ण भूषण.djvu/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी १५८ निःपात केला; किंवा सर्प गरुडास, पक्षी बहिरी ससाण्यास, हत्ती सिंहास पाहून भयभीत होतात, त्याप्रमाणे शिवाजीस पाहून म्लेंच्छ सैन्याची गाळण उडते. (३७) बारिधि के कुंभ-भव, घन बन दावानल, तरुन तिमिर हू के किरन समाज हौ । कंस के कन्हैया, वामधेनु हू के कंटकाल, कैटभ के कालिका, विहंगम के बाज हौ ॥ भूषन भनत जम जालिम के सचीपति, पन्नग के कुल के प्रबल पच्छिराज हौ । रावन के राम कार्तवीज के परसुराम, दिल्लीपति दिग्गज के सेर सिवराज हौ ॥ ३८ ॥ | समुद्रास ज्याप्रमाणे अगस्ति ऋषि, गहन वनास दावाग्नि, निबिड अंधकारास सूर्यकिरणें, फंसास कृष्ण, कामधेनूस कटेरी वन, कैटभासुरास फालीदेवी, पक्ष्यसि बाहिरी ससाणा, वृत्रासुरास इंद्र, सर्पकुलास प्रबल गरुड; रावणास राम, कार्तवीर्यास ( सहस्त्रबाहूस ) परशुराम, त्याप्रमाणे ) शिवराज ! दिल्लीपति औरंगजेबरूपी हत्तीस तुम्ही सिंहासारखे आहो. (३८) | दरबर दौर करि नगर उजारि डारि, कटक कटायो, कोटि दुजन दरब की । जाहिर जहान जंग जालिम है। जोरावर, चलै न कछुक अब एक राजा रब की । सिवराज तेरे त्रास दिल्ली भयो भुवकंप, थर थर काँपति बिलाइति अरब की । हालत दहल जात काबुल कंधार बीर रोस करि काढे समसेर ज्यों गरव की ।। ३९ ॥ हे शिवराज ! दुर्जनांच्या द्रव्याने एकत्रित झालेल्या सैन्यावर आपल्या सैन्यानिशी चाल करून आपण त्यांस फापून काढले आणि त्याची नगरें उध्वस्त केली; आपला युद्धातील हा धोर पराक्रम आणि सामथ्र्य ही जगजाहीर झाली आहेत. आपल्या समोर राव, राजे, बादशहा यांचे फहीं एक चालत नाही. आपल्या दरा-याने दिल्लीला भूकंप होत अाहेत (दिल्लीवाले अयाने फपित अाहेत). अरबस्तान थर थर काँपत अाहे. हे वीर शिरोमणि,