पान:संपूर्ण भूषण.djvu/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी १५२

==

=

-=-

- = शिवाजीने साल्हेरीचे युद्ध जिंकल्याची बातमी ऐकून मुसलमानांच्या काळजात धडकीच भरली. तिन्ही लोक-स्वर्ग, मृत्यु, पाताळ-शिवाजीचे पश गाऊ लागले. या युद्धातील जखमी शिपाई अद्यापि विवळत आहेत. भुषण म्हणतो, शत्रूचे सैन्य कापून कित्येकसि मशकाप्रमाणे उडवून लावले, तर कित्येक पाठ दाखवून पळून गेले व रक्तस्त्राव झाल्यामुळे निःशक्त मालेले व रक्ताने माखलेले पापी तरुण पठाण रणभूमीवर तडफद्धत पडले आहेत. (२५) केतिक दस दल्यो दल के बल दच्छिन चंगुल चॉपि कै चाख्यो । रूप गुमान हन्यो गुजरात को सूरत को रस चूसि कै नाख्या ॥ पंजन पेलि मलिच्छ मले सब सोई बच्यो जिहि। दुीन है भाख्यो । सो सँग हैं सिवराज बली जिन नौरंग में रँग एक न राख्यो ॥ २६ ॥ शिवाजीने आपल्या सैन्याच्या जोरावर कित्येक देशांचे निर्दालन केले. (पराभव केला ). दक्षिण देश तर केव्हाच पादाक्रांत केला; गुजराथेची शोभा आणि अभिमान पार नाहींसा केला; सुरत शहर लुटून येथील वैभव नष्ट केले. शिवसिंहाने म्लेंछसि पंजीत पकडून यथास्थित मर्दन केलें. ज्यान दीनता दाखविली (शरण गेले) त्यांना सोडून दिले. एवढा नवरंगी औरंगजेब; पण बलाढ्य शिवाजीने त्याचा एकही रंग चालू दिला नाहीं (२६) सूबा निरानंद बादर खान गे लोगन बूझत ब्योत बखानो। दुग्ग सबै सिवराज लिये धरि चारु विचारु हिये यह आनो॥ भूषन बोलि उठे सिगरे, हुतो पूना में साइत खान को थानो। ज़ाहिर है जग में जसवन्त लियो गढसिंह में गीदर बानो ॥ २७ ॥ बहादुरखान सुभेदाराने हताश होऊन आपल्या हाताखालील लोकस विचारले, “ ह्या शिवाजीने सर्व चांगले चांगले किल्ले तर हस्तगत करून घेतले; आत तुम्ही पोक्त विचार करून मला योग्य सल्ला द्या.” तेव्हा सर्वच म्हणुं लागले-* आपण उपाय कसला विचारीत आहो? सिंहासारखे