पान:संपूर्ण भूषण.djvu/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१ शिवा-बावना जेव्हा शत्रूच्या बाजूने बाणाचा व गोळ्यांचा सारखा वर्षाव सुरू झाला व मोर्चाच्या आड उभे राहून सुद्धा जीव वाचविणे कठिण झालें तेव्हा शिवरायांनी ललकारून शत्रूवर हल्ला केला; उभय पक्षाकडील वीति चकमक उडाली. फविभूषण म्हणतो, हे शिवराज, मी तुमच्या साहसाचें वर्णन कोठवर करूं? तुमच्या शूरत्वाची ख्याति शूरवीर मंडळींत इतकी पसरली आहे की, युद्धक्षेत्रात तुम्हास नुसते पाहून मराठे गडी मिशविर ताव देत देत शत्रूवर प्रहार करीत उंचीवरून किल्लत उडया घालतात. (२३)। उतै पात साहजू के गजन के ठट्ट छूटे, उमड़ घुमड़ मतवारे घन कारे हैं । इतै सिवराज जू के छूटे सिंहराज और बिदारे कुंभ करिन के चिक्करत भारे हैं ॥ फौजे सेख सैयद मुगल औ पठानन की मिली इखलास खाँ हु मरिन सँभारै हैं । हद्द हिन्दुवान की बिहद्द तर वारि राखी, कैयो बार दिल्ली के गुमान झारि डारे हैं ॥ २४ ॥ तिकडून दिल्लीपति औरंगजेब बादशहाच्या हत्तींच्या झुंडीच्या झंडी काळ्याकुट्ट मेघप्रमाणे निघाल्या आहेत, तर इकडे शिवराजाकडून सिंहासारखे मराठे शूर गडी घोर गर्जना करीत त्या हत्तींच्या मस्तकाचे विदारण करीत आहेत; शेख, सय्यद, मोगल, पठाण यांचे सैन्य इखलासखाँसारखा शूर सरदार देखील संभाळू शकेना. शिवराजाने आपल्या तरवारीच्या जोरावर कित्येक वेळी दिल्लीवाल्यांची घमेंड जिरवून हिन्दुत्वाची मर्यादा राखली. (२४) जीत्यो सिवराज सलहेरि को समर सुनि सुनि असुरन के सुसीने धरकत हैं । देवलोक, नागलोक, नरलोक गावें जस, अजहूँ लौ परे खग्ग दन्त खेरकत हैं ॥ कटक कटक काटि कीटसे उड़ाये केते, भूषन भनत मुख मोरे सरकत हैं। रनभूमि लेटे अघ फेटे अरसेटे परे रुधिर लपेटे पठनेटे फरकत हैं ॥ २५ ॥ ।।