पान:संपूर्ण भूषण.djvu/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन १२ संपादिलेला प्रान्त यवनाचे तावडीत सापडतो असे पाहून हा वृद्धार्ने प्रसंगावधान राखून मोठी नामी युक्ति योजिली. याने त्या वेळी बाजीराव पेशव्यांचे साहाय्य मागितले. या वेळीं श्री० बाजीराव पेशव्यांचा भाग्यसूर्य अनुकूल तळपत होता. पेशव्यांना जे पत्र ह्या म्हाता-याने लिहिले होते त्यात शेवटीं खालील करुणरसपू दोहा लिहिला जो गति ग्राह गजेन्द्र की सो गति जानहु आज । | बाजी जात बुन्दल की राखो बाजी लाज ।। बेंगशाचा पूर्ण पराभव झाला. वृद्ध छत्रसालाने आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बाजीरावास दिला. येणेप्रमाणे ह्या शिवाजी-भक्त छत्रसालाचे स्फूर्तिदायक चरित्र आहे. याच छत्रसालाच्या दरबारी भूपण गेले होते व त्या वेळी शिवरायाच्या दुरबारी राहिलेल्या ह्या कवीचा सन्मान त्यास पालखीत बसवून व आपण दुडा धरून छत्रसालाने केला अशी आख्यायिका आहे. फुटकर ( स्फुट ) शिवराज-भूषण, शिवा-बावनी, छत्रसाल-दृशक याखेरीज भूषणाची भूषण-उल्लास, दृषण-उल्लास, भूषण-हजारा,हीं फाव्ये असल्याचे शिवसिंह सरोजकानी लिहिलं आहे; पण त्यांचा अद्याप पत्ता लागला नाहीं. ह्या काव्यपफच इतस्ततः आढळलेले ६द ‘क्लटकर' म्हणून प्रसिद्ध असावेत. मिश्रप्रतीत हे ११ आहेत, तर त्रिपाठी प्रतींत यांची संख्या १५ आहे त्रिपाठीजींनी प्रथम यापैःf कहीं द 'प्रभा' मासिकात प्रसिद्ध केले. ( सन १९२४ माहे जुन. ) तिस-या आ वृतींत नंतर त्यांचा समावेश भूषण-ग्रंथावलीत ६ ला. हे नवीन द स्वतः त्रिपाठीनीं संशोधन करून प्रसिद्ध केल्यामुळे त्याच्या अनुमतीनेच प्रस्तुत पुस्तकात त्याचा संग्रह केला आहे. काटकर दूतील काही शिवा-बावनीत घातले व शिवा-बावनींतील