पान:संपूर्ण भूषण.djvu/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। । । । =

==

भूषण म्हणतो:-औरंगजेब ! ऐका. तुम्हीं तीर्थासमान पूज्य असलेल्या आपल्या बापास-शहाजहानास कद केले, हे तुमचे कृत्य परम पवित्र अशा मक्केस आग लावण्याइतकेच अनुचित आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेला, त्यातून वडील बंधू जो दारा, त्यालाहि पकडून कैदेत घातले (यावरून मला वाटते ) तुमच्या अंतःकरणात दुयेचा लवलेश नाहीं; दुसरा भाऊ मुरादबक्ष याशी कपटाचरण न केल्याबद्दल कुराण घेऊन खुदाची ( ईश्वराची ) खोटीच शपथ घेतली. अशी ही कृत्ये केली म्हणून तर तुम्हाला बादशाही (राज्य ) मिळाली आहे. ( १३ ) हाथ तसबीह लिये प्रात उटै बन्दगी को, आपही कपटरूप कपट सु जप के। आगरे में जाय दारा चौकमें चुनाय लीन्ह, छत्रहू छिनाया भानो मरे बूढे बापके ॥ कान्हो है। सगोत घात सो मैं नाहिं कहाँ फेरि पील पै तोरायो चार चुगुल के गप के। भूषन भनत छर छन्दी मतिमन्द महा, सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के ॥ १४ ॥ भूषण म्हणतो-हे औरंगजेब ! तुम्ही रोज सकाळीच उठून हाताँत स्मरणी घेऊन ईश्वरप्रार्थना करत, पण हे सर्व ढोंग आहे. तुम्ही प्रत्यक्ष कपटरूप अही. कारण अग्न्यास जाऊन आपल्या सख्ख्या भावासदारास-चौकांत जिवंत चिणले, जिवंत ब वृद्ध बापास मृत समजून त्याचे राजछत्र हिसकावून घेतलें ( व स्वतः राज्य करू लागली. }; मी आता अधिक सांगत नाही. आपल्याच गोत्रजांना चहाडखोर दूतच्या नुसत्य चहाडवरून हत्तीच्या पायाखाली तुडवून मारविले. तुम्ही मोठे धूर्त आह; धर्मशील आहों असे लोकसि दाखवितो, पण तुमचें हें कपट (ढोंग) शेकडों उंदीर खाऊन तपश्चर्या करणा-या मांजरीप्रमाणे आहे ! (१४) [ वरील दोन दाँत कदीने औरंगजेबाचा ढोंगी स्वभाव व त्याची भयंकर कृत्ये यांचे वर्णन केले आहे. भूषणाने हे छंद औरंगजेबाचे अभय घेऊन मग त्यास ऐकविले अशी आख्यायिका आहे. 1. १०