पान:संपूर्ण भूषण.djvu/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ शिवा-बावनी =-=-=-=-=- = | भूषण म्हणतोः-हे शिवराज ! तुमच्या धाकानें बादशहाच्या बेगमा ज्यांना नित्य गुलाबी अत्तर, अर्गजाचा, केशर-कस्तुरीमिश्रित सुगंधित रस, कापूर आदि सुगंधी सामग्री सहजपणे लागत असे, त्या आती सुगंधास पार विसरून गेल्या. पलंगावरून भूमीवर पळभर पाय न ठेवणाम्या स्वाणेपिणे विसरून रानावनातून भटकत फिरत आहेत; आपले हार व केश सांभाळण्याचे देखील त्याँस भान नाहीं; बादशहाच्या बेगमा इतक्या दीन झाल्या आहेत की, नाशपातीसारखे उत्तम उत्तम मेवे खाणा-या त्या वनस्पती खाऊन दिवस कंठीत आहेत. (१०) सौधे को अधार किसमिस जिनको अहार, चारको सो अंक लंक चंद सरमाती हैं। ऐसी अरि नारी सिवराज वीर तेरे त्रास पायनमें छाले परे कन्द मूल खाती हैं। ग्रीषम तपनि ऐसी तपति न सुंनी कान, कंज कैसी कली बिनु पानी मुरझाती हैं । तोरि तोरि आछेसे पिछौरा सों निचौरि सुख कहें अब (सघ) कहां पानी मुकतों में पाती हैं॥११॥ हे वीर शिवाजी ! ज्याच्या प्राणाचा आधार सुगन्ध, ज्यांचा आहार किसमिस (बेदाणा आणि उत्तम उत्तम मैवे) होता, चार (४)च्या अंकातील मध्यभागाप्रमाणे ज्यांची कंबर अतिशय बारीक, व ज्या आपल्या सौन्दर्याने चंद्रास देखील लाजवीत होत्या, अशा त्या सुकुमार शत्रु-स्त्रिया तुमच्या भीतीने पळत आहेत. पळताना त्यांच्या नाजुक पायस फोड येत आहेत. त्या कंदमुळांवर गुजराण करीत आहेत. काननी कधी ऐकिला नाहीं (मग अनुभवणे तर दूरच ) अशा फडफ उन्हाळ्यात, कमळाच्या कळ्या पाण्यावाचून जशा कोमेजतात तशा, त्या सुकून गेल्या आहेत: अंगावरील मूल्यवान् चादरीस (उत्तरीय वस्त्रास ) लावलेल्या उत्तम व पाणीदार मोत्यांपैकी काही मोत्ये तोडून आपल्या तोंडात पाणी निघेल ह्या आशेने पिळीत ओहत, परन्तु या ( पाणीदार) मोयत तहान शम = = = - -