पान:संपूर्ण भूषण.djvu/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी [ शिवाजीच्या सैन्याचा धाक दिल्लीवासियांच्या अंतःकरणात इतका जबरदस्त बसला होता की, पावसाळ्यात आकाशात संचार करणाच्या मेघाकडे पाहून त्यास शिवाजीच्या सैन्याचा भास होत असे; कवीने हुँच वर्णन खालील छत केले आहे.] । बद्दल न होहि दल दच्छिन घमंड महिं, घटन न होहिं दल सिवाजी हंकारी के । दामिनी दमक नाहिं खुले खग्ग वीरन के, बीर सिरछाप लखु तीजा असवारी के ॥ देखि देखि मुगलों की हरमैं भवन त्यागें, उझाकि उझाकि उठे। महंत बयारी के। दिल्ली मति-भूली कहै बात घन घोर घोर बाजत नगारे ये सितारे गढ़धारी के ॥ ४ ॥ भीतीनें भ्रमिष्ट झालेले दिल्लीवासी ( पावसाळ्यात ) आकाशाकडे पाहून म्हणतात, हे मेघ नव्हत, किंबहुना (आपल्या शूरत्वाची) घमेंड बाळगणारे हे दक्षिणी सैन्य आहे. हे ढग नव्हत, किन्तु अभिमानी शिवाजीचे हे दल आहे. चमकणा-या विजेस पाहून म्हणतात, हे विजेचे चमकणे नव्हे, किंबहुना वरच्या हातातील नंग्या तरवारी चकाकत आहेत; (भाग शुद्ध तृतीयेचा ) तीजेचा चंद्र पाहून म्हणतात, हा चंद्र नव्हे तर शिवाजी वीराचा शिरपेच चमकत आहे. हा देखावा पाहून मोगल स्त्रिया आपापलीं घरे-दारे सोडून पळू लागल्या तर कित्येक, ( पावसापूर्वी) वाहणा-या वान्यास भिऊन दचकू लागल्या आहेत. मेघाचा गडगडाट ऐकून त्या म्हणतात की, हा मेघांचा गडगडाट नाही तर सातारा गडाधिपतींच्या डंक्याचा हा दणदणाट आहे. (४) बाजि गजराज सिवराज सैन साजत ही दिल्ली दिलगीर दसा दीरघ दुखन की । तनियाँन तिलक सुथनियाँ पगनियाँ न, घामैं घुमरात छोड़ि सेजियाँ सुखन की ॥ भूषन भनत पति बाँह बहियाँ न तेऊ छहियाँ छबीली ताकि राहियाँ रुखन की । बालियाँ बिथुर जिमि आलियाँ नलिन पर, लालियाँ मलिन मुगलानियाँ मुखन की ॥ ५ ॥