पान:संपूर्ण भूषण.djvu/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी १३८ दरारन ते कमठ करारे फूटे, केरा के से पात बिहराने फन सस के ॥ २ ॥ [ शिवराजाचे सैन्य युद्धास निघाल्यानंतर ठिकठिकाणच्या लोकांची में कशी त्रेधा उडत होती हे ह्या छन्दत दाखविले आहे.] (सर्व सैन्याच्या अग्रभागीं) फडकत असलेले झेंडे पाहून आणि हत्तींच्या घंटाँचा घनघोर ध्वनि ऐकून देशोदेशचे लहानमोठे राजे-महाराजे, शिवाजीच्या सैन्यासमोर उभे राहीनात. शिवराजाच्या डंक्याचा प्रचण्ड शब्द ऐकून डोंगर कोसळून पडू लागले व गवेंच्या गावे व शहरेंच्या शहरे रहिवासी पळून गेल्यामुळे ओस पडू लागली. ( शत्रूच्या ) हत्तींवरील हैद सैल झाले, तसेच हत्तींच्या गंडस्थळावर उडत असलेले भुंगे पार आपापल्या जागी पळून गेले. ( शत्रु स्त्रियांचे ) केशपाश विस्कळित झाले. शिवाजीच्या सैन्याच्या दराच्याने पृथ्वी धारण करणा-या कूर्माची ठिण अशी पाठदेखील फुटून गेली आणि शेषाच्या फणा केळीच्या पानाप्रमाणे फटाफट फाटून गेल्या. (२) प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू मिलि मिल पुसमे गावत बधाई है । भैरों भूत प्रेत भूरि भूधर भयंकर से जुत्थ जुत्थ जागिनी जमाति जुरि आई है ।किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिम डिम डमरू दिगंबर बजाई है। सिवा १ॐ सिव स ‘समाज आजु कहाँ चली', काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥ ३ ।। । [ वरील छन्दत भूषण कवीने एक काल्पनिक शिव-पार्वती संवाद वर्णन केला आहे.] प्रेते, पिशाचें, राक्षस, राक्षसी जमून आपापसांत आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भुते, प्रेते पाँच्या झुडीच्या झुडी जमू लागल्या; कालीदेवता किछकिल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवीत आहेत; हा शिवगणचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारिलें, ‘महाराज ! आज आपली मंडळी कुठे चालली आहे ?' महादेवः-शिवराज कोणा शत्रूवर क्रुद्ध झाले आहेत.(३)