पान:संपूर्ण भूषण.djvu/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी कवित्त मनहरण साजि चतुरंग बीर रंग में तुरंग चढि, सरजा सिवाजी जंग जीतन चलत है । भूषन भनत नाद बिहद नगारन के, नदी नद मद गैबरन केरलत है ॥ ऐल फैल खेल भैल खलक में गैल गैल, गजन की टैल पैल सैल उसलत है । तारा सो तरनि धूरि धारा में लगत जिमि थारा पर पारा पारावार यो हलत है ॥ १ ॥ [ शूर वीर शिवाजी सैन्यासह युद्धास निघाल्यावेळचा देखावा कवीने ३ वर्णिला आहे.] । शूर शिवाजी चतुरंग सैन्य (हत्ती, घोडे, रथ, पायदळ ) तयार करून वीरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्याकरित निघाले आहेत, नगायचा भयंकर ध्वनि होऊ लागला आहे, उन्मत्त हत्तीच्या गंडस्थलांतून निघणारा मद नदी-नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे,सैन्याच्या खळबळीने देशभर गल्लोगल्लींनून कोल्हाळ माजून राहिला आहे, हत्तींच्या एकमेकाँवर रेलण्याने डोंगर उलथून पडतात की काय असे वाटत आहे. सैन्याच्या खळबळीने व हत्तींच्या परस्पर रेटारेंटीनें उडत असलेल्या धुळीने आकाश इतकें भरून गेले आहे की, एवढा मोठा प्रचंड सूर्य, पण एकाद्या लहानशा तान्याप्रमाणे दिसू लागला आहे. समुद्र तर ताटात धावणाच्या पा-याप्रमाणे सारखा आन्दोलन पावत आहे. ( १ ) बाने फहराने घहराने घंठा गजन के, नाहीं ठहराने राव राने देस देस के। नग भहराने ग्राम नगर पाने, सुनि बाजत निसाने सिवराज जू नरेस के। हाथिन के हौंदा उकसाने,कुंभ कुंजर के भौन को भजाने अलि, छूटे लट केस के । दल के